ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र या विशेष मोहीम कार्यक्र मांतर्गत दिव्यांग व्यक्ती हा दिव्यांग प्रमाणपत्रासून वंचित राहणार नाही. यासाठी दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्रांचे प्रमाण शून्य टक्के आणण्यात येईल. त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र शून्य टक्के प्रमाण या विशेष मोहिमेचे उदघाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.याप्रसंगी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम. राजा दयानिधी, जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. रूखमोडे, सुनील केलनका, विरेंद्र जायस्वाल, डॉ.लक्ष्मण भगत प्रामुख्याने उपस्थित होते.बडोले पुढे म्हणाले, राज्यातील किंवा देशातील हा कदाचित पहिला प्रयोग असावा की जेथे अपंगत्वाचे १०० टक्के प्रमाणपत्र देण्याचे काम या कार्यक्र मातून करण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या जवळपास २२ योजनांचा लाभ त्यांना मिळण्यास मदत होणार आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अनेक यंत्रणांनी चांगले सहकार्य केले आहे. दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेले साहित्य देखील शिबिरातून देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचे मोजमाप केल्यानंतर त्यांना साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. आपला कुणी वाली नाही, ही दिव्यांग बांधवांमध्ये असलेली भावना त्यांनी दूर करावी. अडीअडचणीच्या प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असे त्यांनी सांगितले.डॉ.दयानिधी म्हणाले, दिव्यांगांना शून्य टक्के प्रमाणपत्र देण्याचा हा कार्यक्र म अत्यंत उपयुक्त आहे. पूर्वी दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. मात्र या उपक्र मामुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना घरपोच प्रमाणपत्र देण्याचे काम होणार आहे. विविध यंत्रणांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधव प्रमाणपत्रांपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता या विशेष मोहिमेतून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.अल्ताफ हमीद म्हणाले, जिल्ह्यातील दिव्यांग बांधव प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता पालकमंत्री बडोले यांनी घेतली आहे. या बांधवांना भविष्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्ह्यातून आलेल्या ४६३ अपंग व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये अस्थिव्यंग, कर्णबधीर, बहुविकलांग, मतिमंद, अंधत्व/अंशत: अंधत्व या पाच प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली. प्रारंभी पालकमंत्र्यांनी दिव्यांगत्वाची तपासणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कक्षाची पाहणी करून दिव्यांग बांधवांशी व वैद्यकीय अधिकाºयांशी संवाद साधला.प्रास्ताविक अभिजित राऊत यांनी केले. संचालन व आभार विजय ठोकणे यांनी मानले. शिबिरासाठी आलेले दिव्यांग बांधव व त्यांचे पालक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गोंदिया व नागपूर येथील अधिकारी व कर्मचाºयांनी सहकार्य केले.
दिव्यांगांना सक्षम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:04 AM
जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी त्रास सहन करावा लागला.
ठळक मुद्देराजकुमार बडोले : वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्र शिबिर