लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : एका पाण्याने शेतकऱ्यांना हातचे पीक गमवावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. कधी अती तर अल्प पावसामुळे शेतकरी भरडला जात आहे. यावर उपाय म्हणून सिंचनाची सोय अत्यंत महत्वाची आहे. जलयुक्त शिवार योजनेतून हे शक्य होत असून शेतकऱ्यांना सिंचनाची कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २.२३ कोटी रूपयांच्या विविध कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. तालुक्यातील तलाव खोलीकरण, मामा तलाव पुनरुज्जीवन, कोल्हापुरी साठवण बंधारा दुरुस्ती व दुरुस्ती बांधकामाकरिता निधी मंजूर झालेला असून बोळुंदा मामा तलाव पुनरुज्जीवन व बळकटीकरण २१.९४ लाख, कोल्हापुरी साठवण बंधाºयाकरिता ५.८३ लाख मंजूर असून यामुळे ५८.५८ संघमी जलसाठ्यातून २७.७७ हे.आर. जमीन ओलीताखाली येणार. तर आसलपाणी लघू सिंचन तलाव दुरुस्ती २२.०९ लाख, साठवण बंधारा दुरुस्ती ८ लाख मंजूर असून यामुळे ४९५.२० संघमी जलसाठा निर्माण होवून १०३.२० हे.आर. जमीन सिंचनाखाली येणार आहे. कुºहाडी येथील पाझर तलाव दुरुस्तीकरिता २७.३३ लाख, मामा तलाव पुनरुज्जीवन व बळकटीकरणाकरिता १२५.०४ लाख मंजूर झाले असून यामुळे ७८९.५६ संघमी जलसाठ्याने २६३ हे.आर. जमीनीला सिंचनाचा लाभ मिळणार असून एकूण २.२३ कोटी रूपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रेखलाल टेंभरे, जि.प.सदस्य रोहिनी वरखडे, सभापती विजय राणे, पं.स. सदस्य सुरेंद्र बिसेन, सरपंच अल्का पारधी, ऊषा रहांगडाले, ओविका नंदेश्वर, तेजेंद्र हरिणखेडे, योगेश्वरी चानाब, ऊषा पंधरे, माया पंधरे, माया चव्हाण, बुथ अध्यक्ष बाबुलाल पंचभाई, जि.प. प्रमुख ईश्वरदयाल सोनेवाने व शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सिंचनाची कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:26 PM
एका पाण्याने शेतकऱ्यांना हातचे पीक गमवावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. कधी अती तर अल्प पावसामुळे शेतकरी भरडला जात आहे. यावर उपाय म्हणून सिंचनाची सोय अत्यंत महत्वाची आहे.
ठळक मुद्देविजय रहांगडाले : जलयुक्त शिवार कामाचे भूमिपूजन