लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. सध्या रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत विक्रीस आला असून खरीपाप्रमाणेच रब्बीतील धानाला बोनस मिळणार का, असा संभ्रम शेतकºयांमध्ये निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी धानाची सुध्दा जवळपास ३६ हजार हेक्टरवर लागवड केली जाते. सध्या रब्बीतील धानाची मळणी करुन तो विक्रीसाठी बाजारपेठेत येत आहे. बहुतेक शेतकरी हे शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करतात.यंदा सरकारने निवडणुकीच्या तोंडावर खरीपात धानाला ५०० रुपये प्रती क्विंटल बोनस जाहीर केला होता. मात्र हेच धोरण रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू राहील. यासंदर्भातील कुठलेच स्पष्ट आदेश नाही. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुध्दा यावर अद्याप मौन बाळगले आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणारे शेतकरी बोनस मिळणार की नाही या संभ्रमात आहेत. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने व पुढे विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने शासन रब्बी हंगामातही धानपिकाला खरीप हंगामात जाहिर केलेला बोनस कायम ठेवील अशी आशा आहे.खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर तर रब्बी हंगामात ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात येते. मागील वर्षी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या समर्थन मुल्यानुसार धानपिकाला १७५० व १७७० अशा हमीभाव दिला. ५०० रुपये प्रती क्विंटल पकडल्यास २३५० प्रती क्विंटल दर शेतकऱ्यांना मिळतो. लगतच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यात धानपिकाला सरसकट २५०० रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात येत आहे. अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात आहे.प्रत्येक हंगामासाठी हमीभाव व बोनसचे स्वरुप वेगळे असते. खरीप हंगामात दरवर्षी शासनाच्यावतीने बोनस जाहीर करण्यात येते. मात्र, ते बोनस रब्बी हंगामातील धानपिकाला मिळत नाही. रब्बीतील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या काही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर धानाची आवक सुरू झाली असून बोनसचा तिढा मात्र कायम आहे.
खरीपाप्रमाणेच रब्बीला बोनस मिळणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:38 PM
राज्य सरकारने खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. सध्या रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत विक्रीस आला असून खरीपाप्रमाणेच रब्बीतील धानाला बोनस मिळणार का, असा संभ्रम शेतकºयांमध्ये निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देशेतकरी संभ्रमात : केंद्रावर धानाची आवक वाढली