शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

रोहयोच्या कामावर योग्य मजुरी मिळेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:15 AM

रोजगार हमी योजना विभागाच्या केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिव अपराजिता सारंगी या दोन दिवसाच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दरम्यान त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी देऊन पाहणी केली. या योजनेवर काम करीत असलेल्या मजुरांशी संवाद साधून त्यांच्याकडून माहिती घेतली.

ठळक मुद्देअपराजिता सारंगी यांनी साधला मजुरांशी संवाद : रोहयोच्या कामांची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रोजगार हमी योजना विभागाच्या केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिव अपराजिता सारंगी या दोन दिवसाच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दरम्यान त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी देऊन पाहणी केली. या योजनेवर काम करीत असलेल्या मजुरांशी संवाद साधून त्यांच्याकडून माहिती घेतली.या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, रोहयो आयुक्त ए. एस. आर.नायक, रोहयोचे उपायुक्त केएनके राव, कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर उपस्थित होते. सारंगी यांनी तिरोडा तालुक्यातील नवेगाव येथे सुरू असलेल्या पांदन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. तर बिहिरीया येथे सुरू असलेल्या पांदण रस्त्याच्या कामाची पाहणी करून मजुरांशी संवाद साधला. या कामावर तुम्हाला किती मजुरी मिळते, किती तास काम करता, विश्रांतीची वेळ कोणती, ९० दिवस तुम्ही रोहयोच्या कामावर काम करीत असाल तर किती योजनांचा तुम्हाला लाभ मिळतो.रोहयोतून किती जणांच्या घरी गुरांचे व बकºयांचे गोठे बांधण्यात आले आहेत. हा कार्यक्र म कसा सुरू आहे. असे अनेक प्रश्न सारंगी यांनी मजुरांना केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आमच्या उपजिविकेचा प्रश्न सुटला असून ही योजना आमच्यासाठी आधार असल्याचे कामावरील मजुरांनी सारंगी यांना सांगितले.स्वदेशी रोपटी तयार करण्यावर भरगोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथे वनविभागाने रोजगार हमी योजनेतून तयार केलेल्या रोपवाटिकेला सारंगी यांनी भेट दिली.या रोपवाटिकेसह जिल्ह्यातील अनेक रोपवाटिकेत स्वदेशी झाडांची रोपटे तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी काळे यांनी दिली. त्यांनी स्वदेशी जातीचे झाडे लावण्यामागील भूमिका विशद केली. त्यामुळे देशातील विविध राज्यातील रोपवाटिकेत मोठ्या प्रमाणात स्वदेशी झाडांची रोपटी तयार करणार असल्याचे सारंगी यांनी सांगितले. या वेळी उपवनसंरक्षक एस. युवराज, सहायक वनसंरक्षक शेंडे, तहसीलदार अरविंद हिंगे, गटविकास अधिकारी हरिणखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर, वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव उपस्थित होते.सासंद दत्तक गावाला भेटखा.प्रफुल्ल पटेल यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेतंर्गत गोरेगाव तालुक्यातील पाथरीला हे गाव दत्तक घेतले आहे. दौºया दरम्यान सारंगी यांनी या गावाला भेट दिली. गावात झालेल्या विकास कामांची पाहणी केली. ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भुताईटोला गावाजवळील रोहयोतून करण्यात आलेल्या माजी मालगुजारी तलावाच्या खोलीकरणाची तसेच रोहयोतून जगदिश बघेले यांच्या शेतात बांधण्यात आलेल्या विहिरीची पाहणी केली. पाथरी येथील माजी मालगुजारी तलावाच्या खोलीकरणाची पाहणी केली. ग्रामपंचायतजवळील रोपवाटिका व गावात काही लाभार्थ्यांकडे तयार करण्यात आलेल्या शोषखड्ड्यांची पाहणी करुन ग्रामपंचायतला भेट दिली. या वेळी पं.स.सदस्य केवल बघेले, सरपंच ममता जनबंधू व ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.रोहयोतंर्गत झालेल्या बांधकामाची पाहणीरोजगार हमी योजना विभाग केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिव अपराजिता सारंगी यांनी रोहयोतंर्गत झालेल्या बांधकामाची पाहणी केली. सुरतीलाल रहांगडाले यांनी लाभार्थ्याच्या घरी बांधण्यात आलेल्या गुरांच्या गोठयाची पाहणी केली. ग्रामपंचायतला भेट देवून रोहयोच्या कामाची कागदपत्रे तपासली. या वेळी सरपंच मदन बघेले उपस्थित होते.