शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

जि.प.च्या समस्या मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 1:11 AM

ग्रामीण भागातील लाभार्थी व विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाºयांनी लाभार्थ्यांना लाभ मिळावा व विकास कामे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासावी.

ठळक मुद्देविविध विभागांची आढावा बैठक : पाणीटंचाईवर वेळीच नियोजन करा

ऑनलाईन लोकमत गोंदिया : ग्रामीण भागातील लाभार्थी व विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाºयांनी लाभार्थ्यांना लाभ मिळावा व विकास कामे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासावी. जिल्हा परिषदेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देण्यात येणार असून लवकरच मंत्रालयस्तरावर या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची गुरूवारी (दि.२३) जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपूरे उपस्थित होते. बडोले म्हणाले, ग्रामीण भागातील ज्या भागात पाणी टंचाईची स्थिती आहे. अशा गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन करावे व त्यानुसार वेळेत पाणी टंचाईवर मात करावी.जिल्ह्यातील ज्या दलित वस्त्यांमध्ये पथदिवे, समाज भवन नाही तिथे प्राधान्याने देताना बृहद् आराखडा तयार करावा. दलित वस्त्यांमध्ये मुला- मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी अभ्यासिका सुरु कराव्यात. बार्टीमार्फत अभ्यासिकेसाठी पुस्तके पुरविण्यात येईल. दलित वस्तींच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण योजना कुणाला सूचिवता येत असेल तर त्या सांगाव्यात असे सांगून ही कामे करताना ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना विश्वासात करण्यास सांगितले. अनुसूचित जमातीच्या शेतकºयांना योजनांचा लाभ देण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करण्यात येईल. कृषी विभागाने शेतकºयांचे जीवनमान उंचाविण्यासाठी नाविण्यपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. २०२२ पर्यंत सर्वांना घरे द्यायचे असल्याने शासनाकडून घरकुलाचे उद्दिष्ट वाढवून घेण्यास सांगितले. नैसर्गीक आपत्तीत पडलेल्या घरांसाठी तातडीने मदत करावी. रमाई घरकूल योजनेमध्ये अशाच लाभार्थ्यांची निवड करा, ज्यांना घरेच नाही त्यांना २०१९ पर्यंत जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.ग्रामीण भागातील बचत गटातील विकासासाठी यंत्रणांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले पाहिजे. बचतगटाच्या विकासासाठी नियोजनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानाला प्रोत्साहन दिले पाहिजे. रोहयोतून प्राधान्याने पांदन रस्त्याची कामे करावी. त्यामुळे शेतकºयांना सुविधा मिळेल. जिल्ह्यात कुपोषणग्रस्त बालक आढळून येणार नाही याकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्था चांगल्याप्रकारे असावी. नादुरुस्त शौचालय तातडीने दुरु स्त करावी.शाळांमध्ये शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध झाले पाहिजे. जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळा इंटरनेटने जोडल्या पाहिजे असे निर्देश त्यांनी या वेळी दिले. ठाकरे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या विविध विभागाने समन्वय साधून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. अधिकारी व कर्मचाºयांनी यासाठी योग्य समन्वय राखला पाहिजे. जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गावोगावी शौचालयाचा वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याचे सांगितले.सिंचन क्षमता वाढविण्याची कामे कराजिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने नियोजन करावे. माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी. तलाव दुरु स्तीचा विशेष प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. यासाठी निधी उपलब्ध करु न देण्यात येईल. धडक सिंचन विहिरीची कामे तातडीने पूर्ण करावी.वैद्यकीय अधिकाºयांवर कारवाई कराज्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात त्यांच्यावर त्वरीत कारवाई करा.भरारी पथकाच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात व मुख्यालयी असतात याची पडताळणी करावी. मुख्यालयी न राहणाऱ्या आणि आरोग्य केंद्रात सातत्याने गैरहजर असणाºया वैद्यकीय अधिकाºयांवर त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश बडोले यांनी दिले.