अर्जुनी-मोरगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत परवाना परवानाधारक हमालांच्या विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनांकरीता पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक लोकपाल गहाणे यांनी केले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि.१३) आयोजित हमालांना परवाना वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी प्रशासक बंशिधर लंजे, उद्धव मेहंदळे, गिरीश पालीवाल उपस्थित होते. यावेळी हमालांच्या अडीअडचणी व इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी मेहेंदळे व गहाणे यांनी हमालांना मार्गदर्शन केले. अरविंद जांभुळकर यांनी हमालांसाठी अशाप्रकारे पहिल्यांदाच सभेचे आयोजन केल्यामुळे बाजार समितीचे कौतुक केले. इतरांनी सुद्धा समस्या मांडल्या व त्यावर समस्या बाजार समितीच्यावतीने सोडण्यात येईल असे सांगण्यात आले. याप्रसंगी जवळपास १५० हमाल उपस्थित होते. संचालन बाजार समितीचे प्रभारी सचिव संजय सिंगनजुडे यांनी केले. आभार धम्मदीप मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी भरत वाढई, दुलिराम मेश्राम, जुगादे, मंगेश डोये, योगेश मैंद व इतरांनी सहकार्य केले.