लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या १५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषदेत कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात देशाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या भाजप व काँग़्रेस पक्षानी अभद्र युती करुन जि.प.वर सत्ता स्थापन केली. देशाच्या राजकारणात हेवीवेट समजले जाणारे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांचे प्रस्थ कमजोर करण्याच्या उद्देशानेच ही अभद्र युती केल्याची जनमानसात चर्चा आहेत. आता नाना पटोले यांनी बंड पुकारुन भाजपला रामराम ठोकला. अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसला तरी त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत केलेला काँग्रेस उमेदवारांचा प्रचार हा पटोले से स्वगृही (काँग्रेस) परतणार असल्याचे संकेत देत आहेत. मात्र या पार्श्वभूमिवर गोंदिया जिल्हा परिषदेत आधीचे चित्र कायम राहते की हे चित्र बदलते हा सध्या चर्चेचा विषय आहे.राज्याच्या राजकारणात जिल्हा परिषदांना मिनी मंत्रालयाचा दर्जा आहे. येथूनच राज्याच्या बहुतांशी विकासात्मक योजनांची अंमलबजावणी होते. म्हणूनच मिनी मंत्रालय म्हटले जाते. गोंदिया जिल्ह्याचे राजकारण थोडे आगळे-वेगळे आहे. मित्रपक्ष एकमेकांचे शत्रू बनले आहेत हे मागील जि.प.च्या कार्यकाळावरुन दिसून येते. जिल्हा परिषदेत एकूण सदस्यांची संख्या ५३ आहे. यात राष्टÑवादी काँग्रेस २०, भाजप १७ व काँग्रेस १६ असे पक्षीय बलावल आहे. सध्या जि. प. मध्ये काँग्रेस व भाजपची युती आहे. काँग्रेस व भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी राष्टÑवादी काँग्रेसच्या अधिक जागा असतानाही त्यांना सत्तेपासून दूर ठेवले. पक्षनिष्ठा बाजूला सारत काही तथाकथीत भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करुन जिल्हा परिषदेत पद बळकावले. भाजपची ही सर्व खेळी अर्जुनी-मोरगाव येथून चालते. काँग्रेस नेत्यांनीही त्याला संमती देत जि.प. वर काँग्रेस व भाजपचा झेंडा फडकाविला. २०१५ मध्ये जि.प.च्या निवडणूका झाल्या होत्या. त्यावेळी भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले होते. या अभद्र युती स्थापनेत त्यांचाही वाटा होता. मात्र आता त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. जि.प.चा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपून जानेवारी महिन्यात पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी पटोले यांचा कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश होतो काय? हे महत्वपूर्ण मानले जाते. त्यांचा पक्षप्रवेश झाल्यास नवीन खेळी काय असेल हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. त्यातल्या त्यात गोंदियाचे काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांची भूमिका सुद्धा महत्वपूर्ण मानली जाते. त्यावेळी त्यांनी मित्रपक्षाला खो दिला होता. यावेळी त्यांचे काय समिकरण असेल याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. पटोले यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केल्यास व त्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी पटोले यांचेवर गोंदिया व भंडारा जि.प.ची जबाबदारी सोपविली तर निसंकोचपणे ते भाजपशी हातमिळवणी करणार नाही. अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहेत. अशावेळी काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस यात युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सत्तेचा मोह असलेले ही युती आगामी अडीच वर्षासाठी कायम राहावी यासाठी आटोकाट प्रयत्न करतील यात दुमत नाही. खा. प्रफुल पटेल, माजी आ. राजेंद्र जैन व पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहील अशी माहिती जि.प.चे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. शह-काटशहच्या या संग्रामात आणखी काय डावपेच-व्यूहरचना आखले जातात हे येणारा काळच ठरवेल.असे आहे झेडपीतील पक्षीय बलाबलगोंदिया जिल्हा परिषदेत सदस्याची संख्या ५३ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २०, भाजप १७ व काँग्रेस १६ असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस एकत्र आल्यास बहुमताचा आकडा सहज पार करुन सत्ता स्थापन करु शकते. मात्र या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात यावर ते अवलंबून असणार आहे.समेट की संघर्ष कायम राहणारजिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अंतर्गत कलह असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. त्यामुळे १५ जानेवारी होणाºया जि.प.अध्यक्षांच्या निवडणूकीत या दोन्ही पक्ष्याच्या नेत्यांमध्ये समेट घडून सत्ता स्थापन करतात की संघर्ष कायम ठेवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दीड वर्षांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्या दृष्टीकोनातून ही निवडणूक महत्त्वपूर्ण समजली जात आहे.
झेडपीतील चित्र बदलणार की कायम राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 9:58 PM
येत्या १५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषदेत कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात देशाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या भाजप व काँग़्रेस पक्षानी अभद्र युती करुन जि.प.वर सत्ता स्थापन केली.
ठळक मुद्देजि.प.अध्यक्ष निवडणूक : राजकीय समीकरणाकडे लक्ष, पक्षांच्या मंथन बैठका सुरू