लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : सालेकसा तालुक्यातील ग्राम भजेपार येथे महिला व पुरुष खुल्या गटाची कबड्डी स्पर्धा महाराष्टÑ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील संघांमध्ये रंगली. या लढतीत संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर संघाचा महिला गट तर संत गाडगेबाबा कबड्डी क्लब सूर्याटोला (गोंदिया) संघाचा पुरुष गट विजयी झाले व भजेपार चषक पटकाविला.सूर्योदय क्रीडा मंडळ, नवयुवक कबड्डी क्लब व संवेदना बहुउद्देशिय संस्था भजेपार यांच्या संयुक्त विद्यमाने भजेपार चषक कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. जवळपास ६० महिला व पुरुष कबड्डी संघांनी सहभाग नोंदविला. तीन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी हजारो प्रेक्षकांच्या गर्दीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण फुलला होता. महिला गटातून संघर्ष मंडळ नागपूर संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघास ग्रामपंचायत भजेपारच्या वतीने २१ हजार रुपये रोख व पृथ्वीराज शिवणकर याांच्याकडून चषक देण्यात आले. शितला स्पोर्टिंग क्लब दुर्ग (छ.ग.) संघाने दुसरा क्रमांक पटकावला. या संघास नितेश कठाने व चंद्रशेखर बहेकारकडून ११ हजार रुपये रोख आणि राजाराम चुटेकडून चषक देण्यात आले. विद्युत क्रीडा मंडळ मोहाडी संघास तृतीय क्रमांकाचे बक्षीस म्हणून सरस्वता ब्राम्हणकर यांच्याकडून ७ हजार रुपये रोख व मनोज शरणागत यांच्याकडून चषक देण्यात आले. तसेच पुरुष गटातून संत गाडगेबाबा कबड्डी क्लब सूर्याटोला संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघास हेमंत चुटे व उमेश बहेकार यांच्याकडून २१ हजार रुपये रोख व पिंकी ठाकूर यांच्याकडून चषक देण्यात आले.युवा संत कबड्डी क्लब सिल्ली (भंडारा) संघास दुसºया क्रमांकाचे बक्षीस मिळाले. यात भागेश लांजेवार यांच्याकडून ११ हजार रुपये रोख व प्रकाश ब्राम्हणकरकडून चषक मिळाले. तर वायएमसी क्लब गोंदिया संघाने तिसरा क्रमांक पटकाविल्याबद्दल या संघास प्रमोद पाथोडे यांच्याकडून ७ हजार रुपये रोख आणि शामलाल दोनोडे यांच्याकडून चषक देण्यात आले. याबरोबरच किशन चकोले यांच्याकडून २ होम थिएटर, हेमकृष्ण कठाने यांच्याकडून २ मोबाईल आणि रविंद्र बहेकार यांच्याकडून २ सिलिंग फॅन उत्कृष्ट खेळाडूंना देण्यात आले.बॅग्लोरो बुल्सचे प्रो कबड्डी प्लेअर प्रीतम छिल्लर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी सरपंच सखाराम राऊत, उपसरपंच कैलास बहेकार, पोलीस पाटील यशवंत बहेकार, प्रायोजक डबल बूल सिमेंटचे स्टॉकिस्ट आशुतोष अग्रवाल, देवराम चुटे, खुशालराव शिवणकर, सेवकराम बहेकार, दशरथ चुटे, राजू काळे, रमेश चुटे, अग्रवाल, कृष्णकुमार मेंढे, नागदेव दोनोडे, अरुण चुटे, दिलीप पाथोडे, लोकेश चुटे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमासाठी स्थानिक ग्रामपंचायत, गुरुदेव सेवा मंडळ, तंटामुक्त समिती, स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष व ग्रामवासीयांनी सहकार्य केले.छिल्लरची उपस्थिती अन् प्रेक्षकांचा जल्लोषभजेपार चषक कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला बँग्लोरो बुल्सचे प्रो कबड्डी प्लेअर प्रीतम छिल्लर उपस्थित होताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. दरम्यान ग्रामीण भागातदेखील कबड्डीला क्रीडाप्रेमींचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून छिल्लर यांनी समाधान व्यक्त करीत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांचे हजारो चाहते उपस्थित होते. उद्घाटनालादेखील हरियाणा स्टीलर्सचे प्रो कबड्डी प्लेअर प्रमोद नरवाल यांची उपस्थिती विशेष आकर्षक ठरली.
नागपूर व सूर्याटोला संघ ठरले विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 10:11 PM
सालेकसा तालुक्यातील ग्राम भजेपार येथे महिला व पुरुष खुल्या गटाची कबड्डी स्पर्धा महाराष्टÑ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील संघांमध्ये रंगली.
ठळक मुद्देछिल्लरची उपस्थिती अन् प्रेक्षकांचा जल्लोष