शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
5
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
6
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
7
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
8
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
9
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
10
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
11
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
12
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
13
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
15
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
16
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
17
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
19
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
20
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

अंगणवाडीतील ९ हजार चिमुकले आधारविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:51 AM

आधार हे सर्वांचे हक्क व सर्वांना बंधनकारक असे धोरणच शासनाने राबविले आहे. त्यानुसार सर्वांनाच आधारकार्ड नोंदणी करणे गरजेचे झाले आहे.

१७९७ अंगणवाड्या : ९१ टक्के चिमुकल्यांची आधार कार्ड नोंदणीकपिल केकत । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आधार हे सर्वांचे हक्क व सर्वांना बंधनकारक असे धोरणच शासनाने राबविले आहे. त्यानुसार सर्वांनाच आधारकार्ड नोंदणी करणे गरजेचे झाले आहे. अशात जिल्ह्यात ९७.३३ टक्के लोकांची नोंदणी झाली असतानाच जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात जाणाऱ्या ० ते ६ वर्षे वयोगटातील ९ हजार ०६४ चिमुकल्यांची अद्याप नोंदणी झालेली नसल्याची माहिती आहे. यामुळे या चिमुकल्या आधारकार्डविनाच आहेत. मात्र अंगणवाडीतील ९१.११ टक्के चिमुकल्यांची आधारकार्ड नोंदणी झाली आहे. आज प्रत्येकच कामासाठी शासनाने आधारकार्ड असणे गरजेचे केले आहे. आधारकार्ड क्रमांकावरूनच आता त्या व्यक्तीची ओळख होऊ लागली आहे. यात आता चिमुकल्यांनाही त्यांची ओळख मिळावी यासाठी त्यांनाही आधारकार्ड काढणे गरजेचे झाले आहे. यासाठी शासनाकडून ठिकठिकाणी शिबिरे लावून आधारकार्ड नोंदणी करण्यात आली. या अंतर्गत अंगणवाडीत जाणाऱ्या ० ते ६ वर्षे वयोगटातील चिमुकली सुटू याचीही खबरदारी घेण्यात आली. मात्र जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांतील ९ हजार ६४ चिमुकल्यांची अद्यापही आधार नोंदणी झालेली नाही. प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील १ हजार ७९७ अंगणवाड्यांत ० ते ६ वर्षे वयोगटातील १ लाख १ हजार ९३२ चिमुकल्यांची नोंद आहे. यातील ९२ हजार ८६८ चिमुकल्यांची आधारकार्ड नोंदणी झाली आहे. त्याची ९१.११ एवढी टक्केवारी असतानाच ९ हजार ६४ चिमुकले मात्र आधार शिवायच आहेत. आता यासाठी आधारकार्ड शिबिर घेतले जात नसल्याचे कारण म्हणता येईल. शिवाय काही चिमुकल्यांच्या पालकांचेच आधारकार्ड काढण्यात आलेले नाही. त्यामुळे मुलांचेही आधारकार्ड अद्याप काढण्यात आलेले नाही. तसेच १ ते ६ वर्षांच्या चिमुकल्यांचे आधारकार्ड काढले जात असतानाच नवजात बाळांचे आधारकार्ड काढता येत नसल्यानेही १०० टक्के नोंदणी झाली नसल्याचे कारण यंत्रणेकडून सांगितले जात आहे. गोरेगाव तालुका अव्वल जिल्हावासीयांच्या आधारकार्ड नोंदणीत अर्जुनी-मोरगाव व आमगाव तालुका अग्रेसर असतानाच ० ते ६ वर्षे वयोगटातील अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या नोंदणीत गोरेगाव तालुका अव्वल ठरला आहे. गोरेगाव तालुक्यातील २०४ अंगणवाडीतील १० हजार ६७१ चिमुकल्यांपैकी १० हजार २६१ चिमुकल्यांची आधार नोंदणी झालेली असून त्याची ९६.१६ एवढी टक्केवारी आहे. तर त्यानंतर आमगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून येथे १७८ अंगणवाड्यांतील १० हजार ९४१ चिमुकल्यांपैकी १० हजार ३७२ चिमुकल्यांची नोंदणी झाली असून त्याची ९४.३७ एवढी टक्केवारी असल्याची माहिती आहे. तर सर्वात कमी नोंदणी तिरोडा तालुक्यात करण्यात आली आहे. येथे २०६ अंगणवाड्यांतील १२ हजार ९२५ चिमुकल्यांपैकी ११ हजार १३८ चिमुकल्यांची नोंद करण्यात आली असून त्याची ८६.१७ एवढी टक्केवारी आहे.