शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

By admin | Published: October 07, 2016 2:04 AM

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती ढासळल्याने तिचा दोन दिवसानंतर नागपूर येथे

धारगाव केंद्रातील घटना : ग्रामस्थांचा मृतदेहासह अधिकाऱ्यांना घेरावआमगाव (दिघोरी) : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती ढासळल्याने तिचा दोन दिवसानंतर नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सविता रामलाल नेवारे रा.कवलेवाडा असे मृत महिलेचे नाव आहे. शस्त्रक्रियेदरम्यान चुकीची नस कापल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप करीत संतप्त नागरिकांनी धारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर मृतदेहासह तब्बल चार तास पर्यंत अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. भंडारा तालुक्यातील सविता नेवारे या ३२ वर्षीय महिलेला दोन अपत्ये आहेत. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन सदर महिला २८ सप्टेंबरला धारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली. २९ सप्टेंबरला शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिची प्रकृती बिघडत गेली. सविताला प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात व त्यानंतर नागपूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चुकीची नस कापल्याने तिची प्रकृती ढासळली व यातच तिचा मृत्यू झाला.तिच्या मृत्यूला शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.टी. खंडारे व आरोग्य सेविका बांगरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या मागणीला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच नागरिकांनी गर्दी केली. नागपूरहून सविताचा मृतदेह दुपारी १ वाजताच्या सुमारास धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. संतापलेल्या जनसमुदायाने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळीजिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके, नायब तहसीलदार काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, यांच्यासह माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, अनिल गायधने, रुपेश खवास, संजय रेहपाडे, विनोद बांते, शेखर साखरे, राधेश्याम राऊत, बाबुलाल बंसोड, सदाशिव बोंदरे, युवराज नेवारे व ग्रामस्थ उपस्थित होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांना ३५ लक्ष रुपयांची मदत देण्यात यावी, सबंधित डॉक्टराची वैद्यकिय नोंदणी रद्द करण्यात यावी, कुंटुबियातील एकाला नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करीत नागरिकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. जिल्हा आरोग्य अधिकारी उईके यांनी दोन लक्ष रुपयांची मदत देण्याची घोषणा करून तात्काळ स्वरुपात ५० हजार रुपये देण्याचे सांगितले. याप्रकरणी चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. डॉक्टर खंडारे यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)मुले आईविना पोरकीसविताला सात महिन्यांची मुलगी व पाच वर्षांचा एक मुलगा आहे. सवितावर शस्त्रक्रिया करताना तिच्या मुलांना कुटुंबियांनी सांभाळ केला. मुलगी दुधावरची असल्याने आई लवकरच घरी येईल, असे मुलांना समजविण्यात येत येत होते. परंतु ’आई हवी’ हा मुलांचा हट्ट कायमचा हट्टच राहिला. लहानगी आईच्या मृतदेहाला एकटक बघत असताना अनेकांची मने हेलावून गेली. जीवनाचा संघर्ष या छकुलीच्या डोळ्यात जणू सागर म्हणून वाहत होता. सविताचा पती ढसाढसा रडत असताना त्याला धीर तरी कसा द्यावा, हे सुचेनासे झाले.