शहरं
Join us  
Trending Stories
1
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
2
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
3
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
4
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
5
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
6
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या आरोपांनंतर मोठी घोषणा
7
अरे देवा! जेलमध्ये रामलीला, कैद्यांनी केला वानरांचा रोल; सीतेला शोधायला गेले अन् पळाले
8
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
9
भाजपा खासदाराने आश्रमात घुसून साधूला केली मारहाण, संतप्त अनुयायांचं आंदोलन
10
कॉमेडीशी संबंध नसताना प्राजक्ताला कसा मिळाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? आधी नकार दिला पण...
11
'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला-
12
'दिवसाढवळ्या हत्या होत असतील तर बरोबर नाही, सलमान खानच्या जवळच्यांना सुरक्षा पुरवा'; मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
13
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
नीना गुप्तांनी शेअर केला नातीचा गोड फोटो, म्हणाल्या- "माझ्या मुलीची मुलगी..."
15
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
16
चौदाव्यांदा बोनस शेअर देण्याच्या तयारीत 'ही' दिग्गज कंपनी, स्टॉकनं १ लाखाचे केले ४० लाख; जाणून घ्या
17
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल
18
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
19
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
20
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला

महिलांना टाइप २ मधुमेहाचा धोका ! महत्वाचे कारणे कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 3:51 PM

महिलांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे : नियमित व्यायाम व आहाराने टाळा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सध्याची जीवनशैली कमालीची बदलल्याने आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनियमित आहार, दीर्घकाळ बैठे काम, कमी चालणे, व्यायाम न करणे या सवयी अनेक आजारांना खुले आमंत्रण देण्यासारख्या आहेत.

या आमंत्रणामुळे मधुमेहाचा विकार जडण्याचे प्रमाण वाढत आहे. जे लोक जास्त गोड खातात त्यांना मधुमेह हमखास होतो. पण, या आजाराला आपली आळशी जीवनशैलीही तितकीच कारणीभूत आहे. 

लक्षणे काय ? टाइप-२ मधुमेह असलेल्या लोकांना बऱ्याच वर्षांपासून लक्षणे दिसत नाहीत. त्यांची लक्षणे कालांतराने हळूहळू विकसित होतात. यामध्ये खूप तहान लागणे, थकवा येणे, वारंवार लघवी होणे, अचानक वजन कमी होणे, जखम बरी न होणे ही याची प्रमुख लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकारी सुजाता उमेश ताराम यांनी सांगितले. 

काय काळजी घ्याल?टाइप २ मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी न चुकता व्यायाम करणे गरजेचे आहे. शिवाय गोड पदार्थांवर नियंत्रण आणावे. नियमित वेळेवर सकस आहार घेणे गरजेचे आहे. 

कारणे काय ?व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, पाळीच्या तक्रारी, पीसीओडी, थायरॉइडचे विकार ही टाइप-२ मधुमेह होण्याची प्रमुख कारणे आहेत. महिलांमध्ये लठ्ठपणाचा विकार अधिक प्रमाणात आढळून येत आहे.

"तळलेले, मसालेदार पदार्थ खाण्याची आवड असेल, तुमचे काम सतत बसण्याचे असेल, तुम्ही कमी चालत असाल, तुम्हाला उच्च रक्तदाब असेल, कुटुंबातील कोणाला मधुमेह असेल, तुम्ही व्यायाम करीत नसाल किंवा तुम्ही चालत नसाल तर तुम्हाला मधुमेहाचा उच्च धोका उद्भवू शकतो. अलीकडच्या काळात महिलांना टाइप-२ मधुमेहाचा धोका अधिक आढळून येतो." - सुजाता उमेश ताराम, वैद्यकीय अधिकारी डोंगरगाव (सावली).

 

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्सgondiya-acगोंदिया