लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : गावाच्या जडण घडण आणि विकास कामात महिलांचा हातभार लागावा. नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून गावाला नवचैतन्याची उधळण यावी या भावनेतून नऊ वर्षापूर्वी ग्राम सोमलपूर येथे युवा सार्वजनिक महिला शारदा उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षा सुनंदा बोरकर यांच्या कल्पनेतून गावात विविध विधायक उपक्रम राबवून व्यसनाधिनतेचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.मंडळाच्यावतीने गावातील हनुमान मंदिराच्या आवारात शारदा मातेची स्थापना करण्यात आली असून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शारदा उत्सवाच्या माध्यमातून गावातील महिला व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेल्या दारुड्या नवऱ्यापासून मुक्तता होऊन गाव व्यसनमुक्त होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. एवढेच नव्हे तर दारुच्या नशेतून मुक्त होणाऱ्या ग्रामस्थांचा मंडळाच्यावतीने सत्कार केला जातो. आजही गावात दारु विक्रीचा शिरकाव होऊ शकला नाही. गाव सर्वांगसुंदर राहून सर्वत्र खुशहाली निर्माण करुन शरीर स्वास्थ्य पोषक राहण्यासाठी स्वच्छता अभियान राबविला जातो. हातात झाडू घेऊन मंडळाच्या सर्व महिला मोठ्या हिरीरीने घराबाहेर निघून गावातील गल्ल्या, शाळा परिसर, सर्व रस्ते स्वच्छ करतात.एक दिवस गावासाठी देऊन मंडळाच्या महिलांनी विधायक कार्यासाठी पावले उचलल्याचे त्यांच्या उपक्रमावरुन दिसून येत आहे. उत्सवा दरम्यान गरबा-दांडियाचे सादरीकरण करताना ग्रामस्थांची मने जिंकली जातात. गावच्या विधायक कामात मंडळाच्या सुनंदा बोरकर, सुमन हातझाडे, अरुणा मेश्राम, प्रिती कान्हेकर, पुष्पा ठाकरे, मंदा डोंगरवार, शोभा कापगते, चंदा लेंडे, तिलोत्तमा कान्हेकर, प्रभा हातझाडे, वैशाली खुणे, ज्योती हातझाडे, देवांगणा कापगते, रेखा कोसरे, विमल हातझाडे, मंगला ठाकरे, लिला ठाकरे, सत्यभामा कुंभरे, माधुरी लेंडे, मोहिनी हातझाडे, पल्लवी खुणे, पारबता, लता, शितल, गीता हातझाडे, लक्ष्मी, मुक्ता, सीता दिघोरे, शकुंतला, मीरा, अल्का डोंगरवार इत्यादी महिला सक्रीय भाग घेवून गावात उपक्रम राबवित आहेत.
महिलांचा दारूबंदी व स्वच्छतेसाठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:48 AM
मंडळाच्यावतीने गावातील हनुमान मंदिराच्या आवारात शारदा मातेची स्थापना करण्यात आली असून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शारदा उत्सवाच्या माध्यमातून गावातील महिला व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेल्या दारुड्या नवऱ्यापासून मुक्तता होऊन गाव व्यसनमुक्त होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. एवढेच नव्हे तर दारुच्या नशेतून मुक्त होणाऱ्या ग्रामस्थांचा मंडळाच्यावतीने सत्कार केला जातो.
ठळक मुद्देसोमलपूरच्या महिला सरसावल्या : शारदा उत्सव मंडळाचा विधायक उपक्रम