शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

महिलांची हेल्पलाईन झाली ‘हेल्पलेस’

By admin | Published: November 25, 2015 5:24 AM

आपण महिला-तरुणी आहात आणि आपल्यावर अचानक एखादा बाका प्रसंग ओढवला तर स्वत:चा बचाव कसा कराल?....

१०३ क्रमांक कुचकामी : शासनाच्या महिला सुरक्षाविषयक योजनेची लागली वाटमनोज ताजने ल्ल गोंदियाआपण महिला-तरुणी आहात आणि आपल्यावर अचानक एखादा बाका प्रसंग ओढवला तर स्वत:चा बचाव कसा कराल?.... ‘महिला हेल्पलाईन आहे न... १०३ क्रमांकावर डायल करेल आणि लगेच पोलिसांची मदत घेईल’... असे उत्तर तुम्ही देत असाल तर सावधान! पोलिसांच्या हेल्पलाईनवर तुम्ही विसंबून असाल आणि त्यावर फोन केल्याने तुम्हाला लगेच मदत मिळेल, असा विचार तुम्ही केला असेल तर वेळीच सावध व्हा. कारण गोंदिया जिल्ह्यात पोलिसांचा १०३ हा हेल्पलाईन क्रमांक चक्क अनेक दिवसांपासून बंद आहे. ‘हा क्रमांक अस्तित्वातच नाही’, अशी टेप ऐकण्याचा प्रसंग मदत मागणाऱ्या कोणत्याही अबलेवर येऊ शकतो.या हेल्पलाईनची उपयोगिता तपासण्यासाठी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही हेल्पलाईन संकटात सापडलेल्या महिलेची कशी फजिती करू शकते हे उघड केले. १०३ या क्रमांकावर डायल करून एखाद्या अबलेला किती तत्परतेने मदत मिळते हे तपासण्याचा प्रयत्न केला, पण मदत मिळणे तर दूर, त्या हेल्पलाईनच्या भरोशावर राहिल्यास संकटात सापडलेल्या अबलेचा आवाजसुद्धा कोणापर्यंत पोहोचू शकत नाही, याचा प्रत्यय ‘लोकमत’ला आला.जिल्ह्यातील कोणत्याही महिलेला किंवा तरुणीला घरी-दारी सुरक्षिततेचे वातावरण मिळावे आणि त्यांना आकस्मिकपणे ओढवलेल्या संकटात व असुरक्षित वातावरणात तातडीने पोलिसांची मदत उपलब्ध व्हावी यासाठी गृह विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात १०३ हा महिला हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला. एकट्या महिलेला पाहून तिची अब्रू लुटण्याचा प्रयत्न कोणी केला, किंवा चोरट्याने पर्स किंवा गळ्यातील दागिने पळविले, एखाद्या गर्दीच्या ठिकाणी असहायतेचा फायदा घेऊन छेड काढण्याचा प्रयत्न केला किंवा सासरच्या मंडळींकडून एखाद्या कारणासाठी शारीरिक अत्याचार होत असेल अशा कितीतरी प्रसंगात ती महिला, तरुणी कोणीतरी आपल्या मदतीला धावून यावे आणि ओढवलेल्या संकटातून सुखरूप वाचवावे अशी प्रार्थना करीत असते. नेमके यावेळी तिला पोलिसांनी मदत मिळावी या अपेक्षेने राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात १०३ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला. पण गोंदिया जिल्ह्यात हा हेल्पलाईन क्रमांक कुचकामी ठरला आहे.या क्रमांकावर तक्रार नोंदविण्यासाठी ‘लोकमत’ने शनिवारी (दि.२१) आणि मंगळवारी (दि.२४) मोबाईल आणि लँडलाईन फोनवरून अनेक वेळा प्रयत्न केले, पण ‘या नंबरची खात्री करून घ्या, हा क्रमांक अस्तित्वात नाही’ अशी टेप वाजत होती. त्यामुळे एखाद्या महिलेने या क्रमांकावर मोठ्या आशेने फोन केला तर तिच्या पदरी निराशाच पडणार हे उघड झाले. एकीकडे सरकार महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी अशा हेल्पलाईनसारख्या सुविधा निर्माण करीत असले तरी प्रशासकीय उदासीनतेमुळे त्या सुविधांच्या चिंधड्या उडत आहेत.‘बीएसएनएल’ म्हणते, पोलिसांचीच चूकपोलिसांनी फोन बंद असल्याची तक्रार बीएसएनएलकडे कधी केली हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे चौकशी केली असता गेल्या १५ दिवसात पोलिसांकडून कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी १०० क्रमांक बंद असल्याची तक्रार आली होती. पण आम्ही लगेच तो क्रमांक दुरूस्त करून दिला होता. पोलीस कंट्रोल रूममध्ये १०० क्रमांकाचे ४ फोन आहेत. एकाचवेळी चारही क्रमांक बिघडू शकत नाही. फोन सुरू नाही तर त्यात पोलिसांचीच काहीतरी चूक असावी, असे बीएसएनएलच्या अधिकाऱ्याने सांगितले.अधिकाऱ्यांची सारवासारवहा हेल्पलाईन क्रमांक बंद असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना तरी आहे का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांचाही मोबाईल फोन बंद होता. ते सुटीवर असल्याचे समजल्यामुळे अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्याशी संपर्क केला. त्यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस कंट्रोल रूममधील १०० नंबरसह काही फोन बंद पडल्याची कल्पना असल्याचे सांगितले. १०३ हा हेल्पलाईन क्रमांकही तिथेच आहे. आम्ही त्यासंदर्भात बीएसएनएलकडे तक्रार केली असून पुढील आठवड्यात हे फोन सुरू होतील, असे उत्तर त्यांनी दिले.हेल्पलाईनची माहितीच नाहीमहिलांविषयक हेल्पलाईन क्रमांकाबद्दल किती महिलांना माहिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता बहुतांश महिलांना त्याबद्दल माहितीच नसल्याचे त्यांनी सांगितले. काही महाविद्यालयीन युवतींनी मात्र या क्रमांकाची माहिती असल्याचे सांगितले. पण त्यावर मदत मागण्याचा प्रसंग अजूनपर्यंत आला नसल्यामुळे त्या क्रमांकाचा वापर केला नसल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक या हेल्पलाईनची पोलीस विभागाकडून प्रचार-प्रसिद्धी करून महिलांमध्ये असलेली असुरक्षिततेची भावना दूर करणे अपेक्षित आहे. मात्र हेल्पलाईनच सुरू नसल्यामुळे पोलीस आतापर्यंत त्या भानगडीत पडलेले नाही.महिला हेल्पलाईन क्रमांकावर सहसा कोणाचे कॉल येत नाही. पण तरीही तो क्रमांक सुरू असणे गरजेचे आहे. आठ दिवसात हा क्रमांक सुरू केला जाईल. शिवाय त्याची माहिती महिलांना असावी म्हणून प्रचारही केला जाईल.- संदीप पखालेअपर पोलीस अधीक्षक, गोंदिया