शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

महिलांनो, रमाईच्या त्यागाचे स्मरण ठेवा!

By admin | Published: February 14, 2017 1:04 AM

मुलांना घडविण्याची किमया स्त्रियाच करू शकतात. साध्याभोळ्या राहणीमानाचे व्रत अंगिकाररून, पतीकडे कोणत्याही ईच्छा-अपेक्षेचा हट्ट न करता स्वत: कष्ट सहन करून,...

बौद्ध समाज युवा मंच : रमाबाई आंबेडकर जंयतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रमबोंडगावदेवी : मुलांना घडविण्याची किमया स्त्रियाच करू शकतात. साध्याभोळ्या राहणीमानाचे व्रत अंगिकाररून, पतीकडे कोणत्याही ईच्छा-अपेक्षेचा हट्ट न करता स्वत: कष्ट सहन करून, पतीला समाजबांधवांच्या न्याय्य हक्कासाठी लढण्यास वेळोवेळी साथ देणाऱ्या मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या त्यागाचे महिलांनी नेहमी स्मरण ठेवावे, असे मत सामाजिक महिला कार्यकर्त्या व विचारवंत महिलांनी व्यक्त केले.बौद्ध समाज युवा मंचच्या वतीने मिलिंद बौद्ध विहारात रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी डहाट, ज्येष्ट महिला विचावंत सुनिता हुमे, भंडारा येथील तनुजा नेपाले, साकोली येथील वंदना रंगारी, केंद्रप्रमुख बोरकर उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी तनुजा नेपाले होत्या. सर्वप्रथम मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करण्यात आले. वच्छला वालदे व कविता टेंभुर्णे यांच्या हस्ते धम्मध्वज फडकविण्यात आला. आनंद बौद्ध विहारात सामूहिक त्रिसरण व पंचशील ग्रहण करून रमार्इंना अभिवादन करण्यात आले. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी मिलिंद बुद्ध विहार, आनंद बुद्ध विहार मार्गाने अर्जुनी-मोरगाव ते सानगडी रोडवरील रमाबाई आंबेडकर चौकातील रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पथसंचलनासह धम्मरॅली काढण्यात आली. या वेळी रमाईच्या पुतळ्यासमोर ग्रामपंचायत सदस्य दिनेश फुल्लुके, भाग्यवान फुल्लुके, संतोष टेंभुर्णे, अशोक रामटेके, अमरचंद ठवरे, संघमित्रा नंदेश्वर, वर्षा लोणारे, ललिता रामटेके, कमला वालदे व बौद्ध बांधवांनी दीप प्रज्वलन करून अभिवादन केले. यानंतर मिलिंद बुद्ध विहारात सायंकाळपर्यंत विचारमंथन कार्यक्रम घेण्यात आले.प्रास्ताविक सुरेंद्रकुमार ठवरे व ऋतिका फुल्लुके यांनी मांडले. संचालन भाग्यवान फुल्लुके यांनी केले. आभार भारत ऊके यांनी मानले. कार्यक्रमासाठी जितेंद्र रामटेके, अजय वालदे, ओमप्रकाश भैसारे, सुजित ठवरे, निदेश शहारे, गौतम रामटेके, उमेश वालदे, जितेंद्र भैसारे, अक्षय रामटेके, विश्वास डोंगरे, प्रशांत लांडगे, अनमोल रामटेके, राजेश वालदे, राहुल शहारे व सर्व युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)विचारवंत चुकला तर अख्खा समाज गारदयात आमंत्रित महिला विचारवंतांनी रमाईच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यात रमाईच्या त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशातील कोट्यवधी शोषितांचे कैवारी, उद्धारकर्ते झाले. देशाचे शिल्पकार झाले. त्यामुळे महिलांनी रमाईचे नेहमी स्मरण करून येणाऱ्या पिढीला सुसंस्कारित करावे. एका डॉक्टरच्या चुकीच्या निदानाने एक रोगी दगावतो. पण एक विचारवंत चुकला तर समाजाची अख्खी एक पिढी गारद होते. स्वत:च्या कृतीमध्ये परिवर्तन करणे महत्वाचे आहे. जेथे ज्ञान लोप पावतो, तेथे अज्ञान सुरू होतो. जेव्हा विज्ञान सुटते तेव्हा अंधश्रद्धा बहरते, असे प्रबोधन करण्यात आले.