लोकमत न्यूज नेटवर्क्देवरी : आज महिलांना ५० टक्के आरक्षण असून प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटविला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांंनी महिलांना समाज तसेच राजकारणात उंचीवर नेण्याचे काम केले. यामुळे महिलांना सन्मान मिळाला. महिलांना मिळालेले अधिकार नियमित टिकून राहावे याकरिता महिलांनी महिलांच्या अधिकारासाठी समोर यावे, असे आवाहन महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष उषा शहारे यांनी केले.कॉंग्रेस पक्षाच्यावतीने गुरूवारी (दि.१०) देवरी येथे आयोजित महिला मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष उषा मेंढे व सरीता कापगते यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा निरीक्षक कल्पना फुलबांधे, सरपंच गायत्री इरले, आमगाव शहर अध्यक्ष प्रभा उपराळे, सरपंच उषा भांडारकर, पाऊलझगडे, संगीता भेलावे, लखनी सलामे, शामकला गावळ, कल्पना वालदे, माधुरी राऊत, उपस्थित होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी यांनी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना आपण राबवित आहोत. शिलाई मशीन, कुक्कुट पालन यासारख्या लघु उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनी आपली आर्थिक परिस्थिती सुदृढ करावी असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक मांडून संचालन सुषमा घरत यांनी केले तर आभार माधुरी कुंभरे यांनी मानले. यावेळी समता सैनिक दलच्या महिला सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.
महिलांनी महिलांच्या अधिकारासाठी समोर यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 9:36 PM
आज महिलांना ५० टक्के आरक्षण असून प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटविला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांंनी महिलांना समाज तसेच राजकारणात उंचीवर नेण्याचे काम केले. यामुळे महिलांना सन्मान मिळाला.
ठळक मुद्देउषा शहारे : महिला कॉँग्रेसतर्फे महिला मेळावा उत्साहात