शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

महिला शोषण प्रतिबंध व निवारण कार्यशाळा

By admin | Published: March 03, 2017 1:28 AM

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांचे मार्गदर्शनात कार्यस्थळी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक

गोंदिया : धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांचे मार्गदर्शनात कार्यस्थळी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषण प्रतिबंध व निवारण विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. अतिथी म्हणून सेवानिवृत्त शासकीय वकील अ‍ॅड. वीणा वाजपेयी, सविता तुरकर, कार्यशाळा समन्वयक डॉ. नरडे, डॉ. शीतल बॅनर्जी, डॉ. धारणा टेंभरे, डॉ. प्रीती नागपुरे उपस्थित होत्या. प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या उद्देशाची माहिती मांडत प्रा. नरडे यांनी महिला सुरक्षेचे महत्व सांगितले. अ‍ॅड. वीणा वाजपेयी यांनी महिला सुरक्षेचे अधिकार व त्यांची आवश्यकता यावर मार्गदर्शन करुन महिलांच्या शोषणासंबंधीच्या विविध अधिनियमांची माहिती दिली. तसेच विशाखा योजना अंतर्गत कायदा व्यवस्थेची माहिती देवून सतर्क व जागरुक राहण्याविषयी आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न व शंकांचे समाधान केले.एनजीओ सचिव सविता तुरकर यांनी सांगितले, संस्था सदैव महिलांच्या शोषणविरोधात प्रयत्नशील आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसरही असते. मनोधैर्य योजनेसंबंधी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करुन त्या मोबदल्यात मिळणाऱ्या सोयींची व लाभांची माहिती दिली. संचालन मुस्कान शर्मा व अमिषा गुप्ता यांनी केले. आभार मधुमिता सिंग यांनी मानले.