ऑनलाईन लोकमतबोंडगावदेवी : आजच्या स्पर्धेच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात काकणभर तरी पुरुषांपेक्षा सरस, पुढे असल्याचे दिसून येते. सध्या महिलांनी राजकारणात मोठी गरुड झेप घेवून नावलौकिक मिळविल्याचे दिसून येते. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून सरपंच पदाची धुरा सांभाळणाऱ्या पिंपळगाव-खांबी येथील महिला सरपंच उर्मिला महेंद्र मेश्राम यांनी कारभार हाती घेताच गावविकासाला केंद्रबिंदू मानून धडपड सुरू केली. ग्रामस्थांवर असलेली थकबाकी, ग्रामपंचायत कराचा भरणा अल्पावधीतच करून वसुलीचा उच्चांक गाठला.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील पिंपळगाव-खांबी येथील सरपंच उर्मिला मेश्राम यांनी गावाचा अल्पावधीत केलेल्या विकास कार्याचा लेखाजोखा सादर करताना लोकमत प्रतिनिधीशी त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांची गावाच्या विकासासंबंधीची तळमळ स्पष्ट दिसून आली. तीन महिन्यांपूर्वी सरपंच पदाचा कारभार सांभाळणाºया उर्मिला मेश्राम यांनी ग्रामपंचायतच्या कर वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले. त्यांनी आपल्या ग्रामपंचायत पदाधिकाºयांना विश्वासात घेऊन घरोघरी फिरुन ग्रामपंचायतच्या कर वसुली अभियान सुरू केले. कार्यभार सांभाळण्याच्या तीन महिन्यांच्या कालावधीत मालमत्ता कर वसुली दोन लाख ३५ हजार ७०० रुपये, पाणी पट्टी वसुली १ लाख ७३ हजार ६०० रुपये असे ४ लाख ९ हजार ३०० रुपयांची वसुली केली आहे.ग्रामपंचायतच्या सामान्य फंड व पाणी पुरवठा फंड यात रक्कम कमी असल्यामुळे तत्कालीन ग्रामसेवकांनी १४ व्या वित्त आयोगामधून ५० हजार रूपये उसणवारी घेतले. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे ६३ हजार ३९० रुपये वीज वितरण कंपनीचे थकीत होेते. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद करण्याचे नोटीस ग्रामपंचायतला मिळाले होते. सरपंच मेश्राम यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांच्यातील कर्तृत्ववान महिला जागृत झाली. गावकºयांना नळाचे नियमित पाणी मिळावे, गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये. यासाठी पहिल्या प्रथम स्वत:जवळून २० हजार रुपये विद्युत बिलाचे भरले. तसेच उर्वरित रकमेची किस्त पाडावी म्हणून विद्युत विभागाशी पत्रव्यवहार केला. अल्पावधीतच विजेचा बील पूर्ण भरल्याने गावकºयांना नियमित पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे.ग्रामपंचायतची वसुली करताना भेदभाव व राजकारणाचा विचार केला गेला नाही. गावाच्या विकासासाठी सर्वांनी कर वसुली वेळेच्या आत द्या, थकीत राहिल्यास दंड भरावा लागेल, गावाचा विकास खुंटेल, असे समजावून सांगितल्याने ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे सरपंच उर्मिला मेश्राम यांनी सांगितले.पदावर आरुढ झाल्यानंतर काही दिवसांतच तत्कालीन ग्रामसेवक तुरकर निलंबित झाले. एलईडी लाईट, वॉटर कुलर, आर.ओ. साहित्य खरेदी यासारखे अनेक संशयास्पद प्रकरणे बाहेर येवू लागले. त्यामुळे विरोधकांना अल्पावधीत विकास कामे पाहवत नाही. येनकेनप्रकारे वेठीस धरण्याचा अयशस्वी प्रयत्न बरेचदा करतात. गावात सौहार्दपूर्ण वातावरण राहून सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदावे, गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सदैव शर्तीचे प्रयत्न करणार, असे सरपंच उर्मिला यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. व्देषाच्या राजकारणाला मुळीच थारा दिला जाणार नाही, अशी ग्वाही सुध्दा त्यांनी दिली.अवघ्या ३ महिन्यांत ग्रामपंचायत कर वसुलीची विक्रमी वाढ यात त्यांच्या कार्याची चुणूक दिसून येत आहे. गावात आजही रोहयो कामावर शेकडो मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. सरपंच मेश्राम यांना त्यांचे सहकारी वेळोवेळी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
गाव विकासासाठी महिला सरपंचाची धडपड सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:42 AM
आजच्या स्पर्धेच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात काकणभर तरी पुरुषांपेक्षा सरस, पुढे असल्याचे दिसून येते. सध्या महिलांनी राजकारणात मोठी गरुड झेप घेवून नावलौकिक मिळविल्याचे दिसून येते.
ठळक मुद्देउर्मिला मेश्राम : करवसुली अभियानात घेतली मोठी झेप