शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

सासू-सून संवाद स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: July 01, 2014 11:33 PM

लोकमत सखी मंचच्या वतीने स्थानिक रामदेवरा मंदिर परिसरात आयोजित ‘खूब जमेगी जोडी सास-बहू की’ स्पर्धेस मोठ्या संख्येने सखी मंचचे सदस्य व इतर महिलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रंगली स्पर्धा महिलांची : शारदा व सुशीला चौरसिया प्रथम तर ज्योती व उमा द्वितीयगोंदिया : लोकमत सखी मंचच्या वतीने स्थानिक रामदेवरा मंदिर परिसरात आयोजित ‘खूब जमेगी जोडी सास-बहू की’ स्पर्धेस मोठ्या संख्येने सखी मंचचे सदस्य व इतर महिलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात अतिथी म्हणून कल्पना पटेल, करूणा श्रीवास्तव, अ‍ॅड. नीलू मांढरे, सीमा डोये उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात अतिथींच्या हस्ते स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या छायाचित्रावर माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला एका लघू नाटिकेच्या माध्यमातून एक भारतीय सासू कशाप्रकारे आपल्या सुनेला नियंत्रणात ठेवते, याचे व्यंगात्मक शैलीत सादरीकरण करण्यात आले. या लघूनाटिकेला उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला. नाटिकेत सासूच्या भूमिकेत रचना गुप्ता व सुनेच्या भूमिका सुरभी अग्रवाल यांनी साकारली. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांनी सुनेच्या विना घर खाली तर सासूच्या निवा अंगण खाली असल्याचा संदेश देत म्हणाले की, दोन्ही एक दुसऱ्याचे पूरक आहेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सुनांनी आपल्या कलेने हे सिद्ध केले की, ते सासूंची किती काळजी करतात. तसेच सासूंची भूमिका साकारणाऱ्या महिलांनीसुद्धा आपल्या कलेने हे प्रदर्शित केले की तेसुद्धा आपली सून व मुलीमध्ये कसलाही भेद करीत नाही. स्पर्धेत एकूण सासू-सुनेच्या आठ जोड्यांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा विविध फेऱ्यांत पार पडली. पहिल्या फेरीत सासू व सुनेच्या वेशभुशेवर परीक्षकांद्वारे गुण देण्यात आले. यानंतर सासूद्वारे सुनेचा मेकअप करण्यासाठी सर्वांना १० मिनिटांची वेळ देण्यात आले होते. यात सहभागी सर्व स्पर्धक सासूंनी आपापल्या सुनांचा अत्यंत आकर्षक मेकअप करून त्यांना सजविले होते. पुढील फेरीत सासू व सुनेला मायक्रोवेव कुकिंग करावयाची होती. यात सासूंनी सुनांना आपली पसंत सांगितली व सुनांनी त्यांची पसंत लक्षात घेवून स्वादिष्ट भोजन तयार केले. सुनांनी तयार केलेला उपमा व पुलावचा सर्व उपस्थितांनी आस्वाद घेतला. यानंतर सासू व सुनांना वेगवेगळे पाच प्रश्न विचारण्यात आले. सासूला सुनेबाबत व सुनेला सासूबाबत प्रश्न विचारण्यात आले. यानंतर सासू व सून दोघांना समोर बसवून परीक्षकांद्वारे त्यांना प्रश्न विचारण्यात आले. या फेरीत शारदा व सुशीला चौरसिया तसेच श्वेता व थमेश्वरी यांनी सर्व १० प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. प्रीति व भगवती शर्मा यांनी नऊ प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली. शेवटच्या फेरीत सासू व सुनेसाठी एक मिनिट गेम शो ठेवण्यात आले होते. यात सुनेला सासूच्या कमरेला लटकलेल्या मगात शिक्के घालावयाचे होते. यात शारदा चौरसिया अव्वल आली. यानंतर गीता डे व कल्पना पटेल यांनी उपस्थित सर्व महिलांना मायक्रोवेव कुकिंगचे प्रशिक्षण दिले. यात स्प्रिंग रोल, मोमो, नुडल्स, ढोकले तयार करणे शिकविण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शारदा व सुशीला चौरसिया, द्वितीय क्रमांक ज्योती व उमा यांनी मिळविले. तर तृतीय क्रमांक प्रीति व भगवती शर्मा यांनी मिळविले. सर्व स्पर्धकांना अतिथींच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. रचना गुप्ता व सुरभी अग्रवाल यांना लघूनाटिकेसाठी पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रिंकिता मित्तल यांनी तर आभार लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका दीपा भौमिक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष बिलोने व सखी मंचच्या सदस्यांनी सहकार्य केले. उपस्थित सखींनी कार्यक्रमाची प्रशंशा करीत सासू-सून यासाखरीच ‘देवरानी-जेठानी’ यांच्या संबंधावर आधारित स्पर्धा घेण्याची मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)