गोंदिया : ‘गुड बोला-गोड बोला’ हे खरे तर आजचे घोषवाक्यच असायला हवे. शद्बांचे वर्णन मोजक्या शद्बात करणे तसे कठीणच! कारण शद्बांचा महिमा अगाध आणि अमर्याद आहे. शद्ब गोड आणि रसाळ असतील तर किमयागारच ठरतात.आजच्या धावपळीच्या जगात कोणाला कुणाशी बोलायला वेळच नाही ही बिकट समस्याच होऊन बसली आहे. शद्बा विना संवाद शक्य असला तरी, त्यात माधुर्य असेलच असे नाही. गोड बोलून अनेकांची मने जिंकता येतात, अनेकांना नैराश्यातून बाहेर काढता येते तर अनेकांचे दु:ख शीतल करता येते.शद्ब विझवीती पेटते निखारेघावावरी फुंकर घालिती शद्बचांगले, सकारात्मक आणि मृदुभाषी असणारे अधिक लोकप्रिय असतात. मग ते शिक्षक असोत वा इतर व्यवसायी. गोड बोलून अनेक कामे सहज सोप्या मार्गाने करून घेता येतात. गोड आणि आपुलकीने बोलून सत्य अलगदपणे काढून घेता येते. मनात आपले स्थान निर्माण करता येते. विश्वास संपादन करता येतो. एक आशावादी दृष्टिकोन आपोआप निर्माण होतो.‘शद्बांना कळते शद्बांची भाषा,मनात अभिलाषा जगविती शद्ब,शद्ब पेरतात प्रेरणेचे बीज,यशाचे पीक काढिती शद्ब’सैन्यात गेलेले आमचे विद्यार्थी सुटीत नियमित भेटायला येऊन पाया पडताना जगलो तर पुढच्या वेळी येऊ म्हणतात. तेव्हा काळीज गलबलून येते. पण त्यांना खूप यशस्वी व्हा, लवकरच भेटू या आपण, सगळं चांगलंच होईल, अशा धिराच्या शद्बांसह डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू आणि आत्मविश्वास शब्दांची महती सांगण्यास पुरेसा आहे.डॉ. प्रा. वर्षा गंगणे,साहित्यीक, देवरी.
शब्द फुलविती आनंदाचे मळे अश्रूंची फुले करीती शब्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:14 PM