शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

११२८ विहिरींचे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 9:25 PM

दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करता यावी यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. तरीही भूगर्भातील पाणी वाढत नसल्याचे पाहून सिंचनासाठी सिंचन विहीर देण्याची योजना सुरू केली. दोन वर्षाच्या काळात फक्त ८७२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत. तर १ हजार १२८ विहिरींचे काम अपूर्ण आहे.

ठळक मुद्देफक्त ८७२ विहिरींचे काम पूर्ण : जिल्ह्यातील ४२ विहिरी कोरड्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करता यावी यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. तरीही भूगर्भातील पाणी वाढत नसल्याचे पाहून सिंचनासाठी सिंचन विहीर देण्याची योजना सुरू केली. दोन वर्षाच्या काळात फक्त ८७२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत. तर १ हजार १२८ विहिरींचे काम अपूर्ण आहे.राज्य सरकार द्वारे सिंचनविहीर शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे समजले जाते. यामुळे सन २०१६-१७ मध्ये विदर्भातील ११ हजार शेतकऱ्यांना सिंचनविहीर देण्याचे उद्दीष्टे ठेवले होते. यात गोंदिया जिल्ह्यासाठी २ हजार विहिरींचे उद्दीष्ट ठेवून कामांना मंजूरी व कार्यारंभ आदेशही देण्यात आले. परंतु मागील दोन वर्षात खूप कमी विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षात २ हजार विहिरींचे काम पूर्ण करायचे होते. मात्र आतापर्यंत फक्त ८७२ विहीरींचे (४३.६ टक्के) काम पूर्ण करण्यात आले असून १ हजार १२८ विहिरींचे (५६.४ टक्के) काम अपूर्ण असल्याने शेतकºयांचे सिंचन यंदाही फसणार आहे.निसर्गाच्या क्रौर्यामुळे दरवर्षी अत्यल्प पावसाचा बळी शेतकरीच ठरत आहे. शासनाने शेतकºयांना सिंचनाची सोय म्हणून विहीर बांधून देण्याचा मानस बांधला. परंतु कॅबिनेट मंत्री असलेल्या राजकुमार बडोले यांच्या जिल्ह्यात शासनाच्या विहिरींची अशी दुरवस्था आहे.जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागातील अधिकाºयांच्या उदासिनतेमुळे आतापर्यंत शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या विहिरी उपलब्ध होऊ शकल्या नाही.विहिरींमध्ये केले बोअरवेलविहिरींमध्ये बोअरवेल करण्यात आलेल्या विहिरींची संख्याही बरीच आहे. गोरेगाव ६०, गोंदिया ७४, तिरोडा १५, आमगाव २०, सडक-अर्जुनी २४, देवरी १८, अर्जुनी-मोरगाव ४६ व सालेकसात ५२ सिंचन विहिरींवर बोअरवेल करण्यात आले. अर्जुनी-मोरगावच्या ३ विहिरींचे काम अयशस्वी झाले आहे.कोट्यवधी रुपये पाण्यातशेतकऱ्यांच्या शेतीला सिंचन व्हावे यासाठी विहिरींची योजना पुढे आणली. परंतु पाणी कोणत्या ठिकाणी आहे हे न तपासता सरळ कुठेही विहीर खोदल्यामुळे जिल्ह्यातील ४२ विहिरींना पाणी लागले नाही. शासनाचे कोट्यवधी रूपये पाण्यात गेले आहे. ५७२ विहिरींचे काम ७५ टक्यापेक्षा अधिक झाले आहे. १५४ विहिरींचे काम ५० ते ७५ टक्के दरम्यान झाले आहे. २१५ विहिरींचे काम २५ ते ५० टक्के दरम्यान झाले आहे तर १८७ विहिरींचे काम २५ टक्यावर झाले आहे.मिळाले २२ कोटीसिंचन विहिरींसाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला २२ कोटी ५० लाख रूपये दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला विहिरींच्या संख्येच्या आधारावर पैसे देण्यात आले आहे. शेतकºयांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून या विहिरींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला परंतु काम संथ गतीने होत आहे.