लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तलाठ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे तालुक्यातील तलाठ्यांनी मंगळवारी (दि.१) महसूल दिनी काळी फित लावून काम केले.पटवारी संघाने दिलेल्या माहिती प्रमाणे, २ मे रोजी जिल्हाधिकाºयांशी मागण्यांवर सविस्तर चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर पुन्हा २ जून रोजी निवासी उपजिल्हाधिकाºयांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चे अंती निवासी उपजिल्हाधिकारीºयांनी तलाठ्यांच्या मागण्या एक महिन्याच्या आत मान्य करण्याचे आश्वासन दिले होते.परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे तलाठी संवर्गात फार मोठ्या प्रमाणावर असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. करिता विदर्भ पटवारी संघाने १ आॅगस्ट रोजी महसूल दिनी सर्व तलाठी काळ्या फिती लावून काम करतील असा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार, मंगळवारी (दि.१) तालुक्यातील एकूण १७ साझ्यातील तलाठ्यांनी सकाळी तहसील कार्यालयात एकत्रित होवून काळ्या फिती लावल्या आणि शासनाचा निषेध केला. तर काळी फित लावूनच दिवसभर आपआपल्या कार्यालयात जाऊन आपले कर्तव्य बजावले.या निषेधानंतरही शासनाने दुर्लक्ष केले तर पुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पटवारी संघाने दिला आहे.तालुक्यात काळी फित लावणाºया तलाठ्यांमध्ये ठाकरे, बागळे, तुरकर, मेश्राम, वालोदे, बोखडे, पंधरे, राऊत, वरखडे, बघेले, कळंबे, गुप्ता, उपदृष्टा, नागपुरे, बागळे, काकडे तसेच मंडळ अधिकारी रघुवंशी, हत्तीमारे आणि शहारे यांच्या समावेश होता.
काळी फित लावून केले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:31 AM
तलाठ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे तालुक्यातील तलाठ्यांनी मंगळवारी (दि.१) महसूल दिनी काळी फित लावून काम केले.
ठळक मुद्देतलाठ्यांचे आंदोलन : मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा