गोंदिया : जिल्ह्यातीच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शिक्षकांच्या अडचणीत सुखदुखात धावून येणारी समिती म्हणजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती होय. आपल्या जिल्ह्यात समितीमध्ये मनोज दीक्षीत, एल. यू. खोब्रागडे, किशोर डोंगरवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मग ते माझ्यासारखे केंद्रप्रमुखाचे काम असो, मुख्याध्यापकाचे कार्य असो की सर्वसामान्य शिक्षक बंधू-भगिनीचे कार्य असो, ते प्रत्येकवेळी मदत करतात. संस्कारक्षम व शिलवान समाज निर्मितीसाठी कुटुंबाच्या बरोबरीने महिलासुद्धा कार्य करतात. अशा शिलवान सावित्रीच्या लेकीचा सत्कार करण्याचा पुढाकार समितीने घेतला. आज संपूर्ण जिल्ह्यात सत्कार होत आहे. एकंदरीत शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन खमारी केंद्रातील केंद्रप्रमुख अंजली ब्राह्मणकर यांनी केले.
सत्कार समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख म्हणून तथा जिल्हा मार्गदर्शक एल. यू. खोब्रागडे, तालुका सरचिटणीस शिवकुमार बिसेन, महिला प्रतिनिधी रेखा बोरकर, कार्यालयीन शिक्षक मुकेश रहांगडाले, शंकर ठाकरे, दखने, बोपचे जांभुळकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून करण्यात आले. एल. यू. खोब्रागडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून समितीची वाटचाल प्रगतिपथावर प्रकाश टाकला. शिक्षक समितीने आपल्या बंधू-भगिनीचे प्रश्न सोडविण्यासाठी काय बलिदान दिले यावर सविस्तर माहिती विशद केली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते खमारी केंद्रातील केंद्रप्रमुखसह ३६ शिक्षिकांचे प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये रेखा बोरकर, अंजली ब्राम्हणकर, गीता दोनोडे, निशा फुंडे, छाया डोये, जयश्री बारबुद्धे, शिला मानकर, मनोरमा राऊत, ज्योती बघेले, कल्पना बनकर, प्रियंका माने, यशोदा बडवाईक, गीता बोपचे, प्रियंका गेडाम, निर्मला करंजेकर, जयश्री तरोणे, यशोधरा सोनवाने, किरण कठाने, आशा गजभिये, ललीता भुरे, भौतिका मुलतानी, अंजली धोेटे, अभिलाषा बिसेन, शुभांगी आष्टीकर, योगीता येळणे, प्रतिमा गेडाम, शालू रामटेके, रजनी खवले, मीनल बैस, प्रमिला बांबोडे यांचा समावेश होता.