शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

कार्यकर्ता हीच भाजपाची खरी शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:03 AM

जनसंघ ते भाजप या पक्षाच्या प्रवासात अनेक कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण जीवन पक्षासाठी समर्पित केल्याने आज जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपची ओळख निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआंबटकर : शहर भाजयुमो व महिला मोर्चा दिवाळी स्नेहमीलन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनसंघ ते भाजप या पक्षाच्या प्रवासात अनेक कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण जीवन पक्षासाठी समर्पित केल्याने आज जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपची ओळख निर्माण झाली आहे. भाजयुमो व महिला मोर्चाद्वारे दिवाळी स्नेहमीलन कार्यक्र मात वरिष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार हे पक्षातील संस्कार प्रकट करणारे असून कार्यकर्ता हीच भाजपाची खरी शक्ती आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश महामंत्री डॉ. रामदास आंबटकर यांनी केले.शहर भाजयुमो व महिला मोर्चाच्या संयुक्तवतीने शुक्रवारी (दि.१६) आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. रमेश कुथे होते. यावेळी प्रामुख्याने आ. डॉ. परिणय फुके, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी खा. चुन्नीभाऊ ठाकूर, माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. भेरिसंह नागपुरे, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे, जि.प. सभापती विश्वजीत डोंगरे, जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, डॉ. राधेश्याम अग्रवाल, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जिल्हा महामंत्री रविकांत बोपचे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, किशोर हालानी, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष चव्हाण, संजय कुळकर्णी, नप उपाध्यक्ष शिव शर्मा, नगरसेवक भरत क्षत्रीय, माजी जिप अध्यक्ष रजनी नागपुरे, नप सभापती आशालता देशमुख, नगरसेवक राजकुमार कुथे, वरिष्ठ कार्यकर्ते गोविंददराव पुंड, सुखराम महारवाडे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष मैथीली पुरोहित, युवा मोर्चा शहर अध्यक्ष नेत्रदीप गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. आंबटकर यांनी, भविष्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी पक्षातील बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख यांनी जोमाने कार्य करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोककल्याणकारी योजना व निर्णय जनतेपर्यंत पोहचवावे. आजचा हा दिवस संकल्प घेण्याचा असून पक्षाची शक्ती वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक मेहनत घ्यावी, असे सांगीतले. अध्यक्षीय भाषणात कुथे यांनी, येणाºया निवडणुकांमध्ये विजय संपादन करण्यासाठी युवा मोर्चा, महिला मोर्चासह प्रत्येक आघाडी व बुथ रचना, शक्तीशाली करण्याचे मत व्यक्त केले. आ. फुके यांनी, स्नेहमिलन हे मित्रत्व व प्रेमाचा बंध घट्ट करण्याचे एक माध्यम असल्याचे सांगितले. यानिमित्त त्यांनी सीएम चषक स्पर्धेबद्दल माहिती देऊन स्पर्धेत अधिकाधिक युवक व युवतींना सहभागी करु न घ्यावे असे कार्यकर्त्यांना सांगीतले.यावेळी जिल्हाध्यक्ष पटले व नगराध्यक्ष इंगळे यांनी वरिष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार हा नवीन कार्यकर्त्यांना उर्जा देणारा असल्याचे सांगीतले. प्रास्ताविक महिला मोर्चा शहर अध्यक्ष मैथीली राम पुरोहित यांनी मांडले. संचालन जिल्हा प्रचार-प्रसार प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला यांनी केले. आभार संजय कुळकर्णी यांनी मानले.पक्षातील वरिष्ठांचा सत्कारया कार्यक्रमाचे निमित्त साधून पक्षातील वरिष्ठ सदस्य माजी खा. चुन्नीलाल ठाकूर, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम अग्रवाल, भाजपाचे वरिष्ठ कार्यकर्ते गोंिवदराव पुंड, सुखराम महारवाडे यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :BJPभाजपा