शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

कार्यकर्त्यांनो, जनहिताची कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:32 PM

निवडणुकीपूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यातील सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. जनतेला केवळ मोठी मोठी स्वप्ने दाखवून स्व:हित साधण्यावर या सरकारने भर दिला.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

आॅनलाईन लोकमतगोरेगाव : निवडणुकीपूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यातील सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. जनतेला केवळ मोठी मोठी स्वप्ने दाखवून स्व:हित साधण्यावर या सरकारने भर दिला. त्यामुळे या खोटारड्या आणि संधीसाधू सरकारचा खरा चेहरा आता जनतेपुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या मार्गी लावून जनहिताची कामे करावी. असे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी (दि.२३) येथे केले.स्थानिक शारजा लॉन येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. राजेंद्र जैन, माजी आ. दिलीप बन्सोड, राकाँ जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा सचिव गोविंद खंडेलवाल, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, नगरसेवक रुस्तम येळे, जि.प.सदस्या ललीता चौरागडे, राकाँ तालुकाध्यक्ष केलवराम बघेले, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, बाबा बहेकार, जि.प. गटनेता गंगाधर परशुरामकर, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष कमलेश बारेवार, माजी पं.स.सदस्य डुमेश चौरागडे, प्रदीप जैन, विना बिसेन, प्रिती रामटेके, सुनिता मडावी, अनिता तुरकर, छाया हुकरे, नामदेव डोंगरवार, किशोर तरोणे उपस्थित होते.पटेल म्हणाले, सध्या सत्तेत असलेले सरकार म्हणजे जनतेला भुलथापा देणारे सरकार आहे. शेतकऱ्यांची कर्ज माफी असो, शेतकऱ्यांना देण्यात येणाºया सुविधा असो यासाठी अनेक अडचणी निर्माण करुन गोरगरीबांना लाभापासून वंचित ठेवण्याचे काम विद्यमान सरकारकडून केले जात आहे. या सरकारचा खरा चेहरा उघड करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन करित त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असो वा नसो आमच्या पक्षाने नेहमीच जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याचे काम केले आहे. निवडणुकीपूर्वी विकास कामे करुन परिसराचा कायापालट करु असे सांगणाऱ्यांनी सांगता येईल असे एकही विकास काम केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.बन्सोड यांनी कार्यकर्त्यानी आपल्या तालुक्यातील गावागावातील प्रभाग वॉर्ड, बुथ संघटन बळकट करण्यासाठी काम करावे . हे कार्य करत असतानाच शेतकऱ्यांना, गोरगरीब लाभार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबाबत विचारणा करुन त्यावर तोडगा काढून द्यावा. गाव पातळीवर संघटन मजबूत करावे. या वेळी माजी विजय शिवणकर, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी तालुक्यातील अनेक गावात आघाड्या स्थापन करुन जनसंपर्क वाढविण्याचे कार्य कार्यकर्त्यांना देण्यात आले. नवयुवकांच्या नावाच्या नोंदणीसह मतदार याद्या तयार करुन त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा. यासाठीही कार्यक्रम तयार करण्यात आला.गाव प्रमुखाकडे ही जबाबदारी देण्यात आली. कार्यकर्ता मेळाव्याला हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.