लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खोटारड्या गोष्टींचा प्रचार करून भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळविली. मात्र त्यांचा हा डाव जनतेने ओळखला आहे. अशात सामान्य जनतेला याशी अवगत करण्याची वेळ आली आहे. यासाठी बुथ स्तरावर कार्यकर्त्यांनी मजबुतीने कार्य करण्याची गरज असून असे झाल्यास येणाऱ्या यश नक्कीच मिळणार असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सडक-अर्जुनी येथील त्रिवेणी हायस्कूलच्या मैदानात आयोजीत बुथ सदस्य व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिलीप बंसोड, म्हाडाचे माजी अध्यक्ष नरेश माहेश्वरी, राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, तालुकाध्यक्षअविनाश काशिवार, रमेश चुºहे, किशोर तरोणे, मिलन राऊत, देवचंद तरोणे, छाया चव्हाण, जीवन लंजे, रूपविलास कुरसुंगे, नरेश भेंडारकर, सचिन लोहिया, गजानन परशुरामकर, डॉ. कारे, प्रभुदयाल, लोहिया, शिवाजी गहाणे, दिनेश कोरे, रजनी गिरीपूंजे, लोकपाल गहाणे, लक्ष्मण चंद्रिकापुरे, मंजू डोंगरवार, डी.यु.रहांगडाले, एफआरटी शाह, रिता लांजेवार, आनंद अग्रवाल, इंदू परशुरामकर, चंद्रप्रभा मुनेश्वर, काळसर्पे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना खासदार पटेल यांनी, केंद्र व राज्यातील सरकारच्या विविध क्षेत्रातील अयशस्वीतेने सर्वसामान्य जनत व शेतकरी त्रस्त आहेत. महागाईने सर्वांचे कंबरडे मोडले आहे. सरकार डिजल व पेट्रोलचे काही दर कमी करून जनतेला लॉलीपॉप देत आहे. मात्र पेट्रोल व डिजेलच्या दरांत दररोज वृद्धी होत असून परिणामी महागाई वाढतच आहे. केंद्र व राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे गोंदिया व भंडारा जिल्हा पिछाडला आहे. भाजपचा हा खोटारडेपणा जनतेने ओळखला आहे.यामुळे जनतेला त्यांचे खरे रूप दाखविण्यासाठी बुथ कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. एवढेच नव्हे तर, प्रत्येक बुथवर सध्या कार्यरत कायकर्त्यांच्या ऐवजी आणखी १० नवे सदस्य जोडण्याचे आवाहन केले.याप्रसंगी कोहमाराच्या सरपंच वंदना धोटे, शिवाजी गहाणे, डव्वाच्या सरपंच पुष्पलता बडाले, घोटीचे सरपंच दिनेश कोरे यांनी विचार व्यक्त केले. संचालन तालुकाध्यक्ष काशिवार यांनी केले. आभार शाह यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तांसह गावांत नियुक्त केलेले बुथ सदस्यही मोठ्या संख्येत उपस्थित होते.
संघटन मजबुतीसाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 9:26 PM
खोटारड्या गोष्टींचा प्रचार करून भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळविली. मात्र त्यांचा हा डाव जनतेने ओळखला आहे. अशात सामान्य जनतेला याशी अवगत करण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : सडक- अर्जुनी येथील बुथ सदस्य व कार्यकर्ता मेळावा