लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन मंगळवारपासून (दि.३) कामबंद आंदोलन सुरू केले असून जिल्हा परिषदेवरमोर्चा काढला. शेकडोच्या संख्येत जिल्हा परिषदेवर आशा सेविका धडकल्या होत्या. त्यांनी यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.आशांना १५ हजार व गटप्रवर्तकांना २५ हजार रूपये मासीक मानधन द्यावे, आशा व गटप्रवर्तकांना महागाई भत्ता द्यावा, वयाच्या ६० वर्षानंतर सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुार आशा व गटप्रवर्तकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी, गटप्रवर्तकांना टी.ए. भत्ता देण्यात यावा, आशांना प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातून (वेतन) कामाचा मोबदला देण्यात यावा, आशांना प्रसूती करीता जिल्हा रूग्णालय किंवा तालुका रूग्णालयात प्रकरण नेल्यानंतर त्यांना दाखला देऊन परत करण्यात यावे, प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र खोली उपलब्ध करून द्यावी, आशांना ज्या कामांचा मोबदला दिला जात नाही ते काम करवू नये, परिसरात फिरण्यासाठी आशांना सायकल व गटप्रवर्तकांना स्कुटी शासनाकडून देण्यात यावी, दरमहा १० तारखेच्या आत आशा व गटप्रवर्तकांना वेतन देण्यात यावे, कामगारांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी वेळोवेळी येणाºया तक्रारी मार्गी लावण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात यावी व समितीवर संघटनेचे प्रतिनिधी देण्यात यावे या मागण्यांना घेऊन मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलनात रामचंद्र पाटील, शालू कुथे, करूणा गणवीर, कल्पना डोंगरे, चरणदास भावे, उषा बारमाहे, माया बोटे यांच्यासह मोठ्या संख्येत आशा व गटप्रवर्तक उपस्थित होते.
आशा व गटप्रवर्तकांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 6:00 AM
आशांना १५ हजार व गटप्रवर्तकांना २५ हजार रूपये मासीक मानधन द्यावे, आशा व गटप्रवर्तकांना महागाई भत्ता द्यावा, वयाच्या ६० वर्षानंतर सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुार आशा व गटप्रवर्तकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी,.....
ठळक मुद्देजिल्हा परिषदेवर मोर्चा : शेकडो आशा व गटप्रवर्तकांची उपस्थिती