शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

सावरटोला येथे रंगले ‘महाविद्यालयीन महायुद्ध’

By admin | Published: October 24, 2015 1:49 AM

प्रचंड उत्साहाचे वातावरण... सेलिब्रेटींना पाहण्यासाठी प्रेक्षकांची ताणलेली उत्कंठा... उत्कृष्ट सजविलेला रंगमंच आणि आकर्षक रंगीबेरंगी प्रकाशझोतांनी उजळून निघालेला आसमंत...

सेलिब्रेटींचे आकर्षण : मस्ती...पावित्र्य अन् नृत्याविष्काराची धम्मालसंतोष बुकावन/किशोर शंभरकर सावरटोलाप्रचंड उत्साहाचे वातावरण... सेलिब्रेटींना पाहण्यासाठी प्रेक्षकांची ताणलेली उत्कंठा... उत्कृष्ट सजविलेला रंगमंच आणि आकर्षक रंगीबेरंगी प्रकाशझोतांनी उजळून निघालेला आसमंत... अत्याधुनिक ध्वनी नियंत्रण व्यवस्थेवर मदहोश करणारे संगीत आणि हवीहवीशी वाटणारी मंद वाऱ्यासह अंगावर झेपावणारी थंडी... हे वातावरण एखाद्या शहरातील कॉलेजच्या झगमगत्या गॅदरिंगचे नाही, तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला या गावातील होते. येथे रंगलेल्या नृत्य स्पर्धेतील या वातावरणाने प्रेक्षकांसह साऱ्यांना मंत्रमुग्ध करून टाकले.उत्साहाला आलेली भरती...प्रचंड जल्लोष... टाळ्यांचा एकच कडकडाट... तरुणाई व आबालवृद्ध महिला पुरुषांना नृत्याविष्काराची प्रतीक्षा... तेवढ्यातच ‘एंट्री’ होते ती परीक्षकांची. परीक्षकातील वुगी-बुगी व दम-दमा-दम शो विजेती अपूर्वा काकडे हिच्या नृत्याने कार्यक्रमाचा श्रीगणेशा होतो. तिच्या ‘टिप-टिप बरसा पाणी’ या गाण्यावरील नृत्याने अख्खे सावरटोला मदहोश झाले होते.स्पर्धेची खरी सुरुवात होते एन.एम.डी. कॉलेज गोंदियाच्या समूह नृत्याने. राहुल बघेले व सकारी संचाने अदिमायेचा गरज व गणेशवंदनायुक्त बॉलिवूड समूह नृत्याचे अप्रतिम सादरीकरण करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. जयदुर्गा कनिष्ठ महाविद्यालय गौरनगरच्या चमूने येत वतन...ये वतन... जलवा....जलवा या देशभक्तीपर गीताने प्रेक्षकांमध्ये राष्ट्रभिमानाचे स्फुरण जागविले. मुकुंद विद्यालय दिघोरी-मोठीच्या चमूने प्रस्तुत केलेल्या ‘मला जाऊ द्या ना घरी...आता वाजले की बारा... या सोलो लावणीने तर रसिकांवर मोहिनीच घातली.सुरेल गीत, संगीत, नृत्य, आदिमायेचा गजर, अंधकार रात्री रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, रसिकांचा उत्साह व पावित्र्याने अगदी वातावरण भारले गेले. एकापेक्षा एक अशा सरस लोकप्रिय हिंदी व मराठी गीतांचे सादरीकरण करुन स्पर्धकांनी उपस्थितांची दाद घेतली. या धम्माल कार्यक्रमात झालेल्या प्रत्येक उत्कृष्ट सादरीकरणामुळे परीक्षकांनाही बुचकळ्यात पाडले होते. सावरटोलाच्या खतरा मंडळाने आयोजित केलेल्या या महाविद्यालयीन महायुद्धास रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या वेळी सुमारे पाच हजाराहून अधिक प्रेक्षकांनी सावरटोला या खेडेगावात हजेरी लावून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे आणखी दोन वैशिष्ट्ये आहेत. इजाज खान यांनी हिंदी व मराठी भाषेत अप्रतिम सूत्रसंचालन केले. यावेळी त्यांनी नॉन स्टॉप ६० चित्रपट अभिनेते व राजकीय व्यक्तींचे डॉयलॉग सादर केले. इंडिया रायजींग स्टार व इंडिया गॉट टॅलेंट विजेते जादूगर आयी यांनी जादूचे प्रयोग सादर करुन प्रेक्षकांना अवाक केले. या स्पर्धेत ११ हजाराचे प्रथम पारितोषिक एस.एस.जे. महाविद्यालय अर्जुनी मोरगाव, सात हजाराचे द्वितीय पारितोषिक डी.बी. सायन्स महाविद्यालय गोंदिया तर पाच हजाराचे तृतीय पारितोषिक अनिल रामटेके सानगडी यांनी पटकाविले. हा कार्यक्रम गावकऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.