लोकमत न्यूज नेटवर्क परसवाडा : तिरोडा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कन्या कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. स्किल इंडिया मोहिमेअंतर्गत येथील नववी, दहावी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना आॅटोमोबाईल व मल्टी स्किल या दोन विषयाचे व्यवसाय प्रशिक्षण दिले जात आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आॅटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांनी साहित्य प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, प्रश्न मंजुषा, पोर्टपोलिओ, प्रेझेंटेशन या कार्यक्रमात सहभाग घेतला. मल्टी स्किल विषयांतर्गत साहित्य प्रदर्शन व बल्ब, होल्डर, पीन, बटन यांच्या जोडणीचे यशस्वी प्रात्याक्षिक करुन दाखविले. यावेळी प्राचार्य एन.एस. रहांगडाले यांनी व्यवसाय शिक्षणाचे महत्व सांगितले. याप्रसंगी ए.बी. ढोले, सी.ए.खोब्रागडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आॅटोमोबाईल विषयाचे प्रशिक्षक यु.एच. रहांगडाले व मल्टी स्किल विषयाचे प्रशिक्षक एम.एस. डोहळे यांनी केले.
जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:22 AM