अर्जुनी मोरगाव : वाचन करताना विद्यार्थ्यांनी पुस्तक, गाईडचा वापर न करता माहितीच्या मूळ स्रोतांचा वापर करावा. स्वतःचे टिपण काढून अभ्यास करावा. यामुळे वाचनाची आवड, सवय निर्माण होईल. कोरोनाकाळात विद्यार्थ्याचे वाचनाकडे अधिक लक्ष आहे. लेखनाकडे दुर्लक्ष होत आहे. वाचन जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच लेखनही महत्त्वाचे असल्याचे मत डॉ. धनंजय गभने यांनी व्यक्त केले.
ते एस. एस. जे. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित वाचनदिनप्रसंगी बोलत होते. केरळ राज्यातील ग्रंथालय चळवळीचे जनक पी. एन. पनिकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचन दिवस संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाने कार्यक्रमाचे आयोजन केले. कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता हा कार्यक्रम ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल उपस्थित होते. ग्रंथपाल प्रा. अजय राऊत यांनी या दिवसाचे महत्त्व प्रास्ताविकातून विशद केले. त्यांनी पनिकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. संचालन डॉ. प्रा. गोपाल पालिवाल यांनी केले. प्रा. राऊत यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी ग्रंथालय समिती सदस्य डॉ. श्रीकांत नाकाडे, डॉ. राजेश चांडक, डॉ. शरद देशमुख, संजय शेंडे, प्रा. शेखर राखडे यांनी सहकार्य केले.
===Photopath===
190621\img-20210619-wa0009.jpg
===Caption===
पनिकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करताना प्राचार्य डॉ चंदेल