शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
5
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
7
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
9
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
10
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
11
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
12
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
14
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
16
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
18
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
20
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?

समाजकल्याण विभागाचे लेखणीबंद आंदोलन

By admin | Published: September 13, 2016 12:37 AM

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व विविध मागण्यांना घेवून सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी

गोंदिया : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व विविध मागण्यांना घेवून सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने सोमवार(दि.१२) पासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले. शासनाने नियुक्त केलेल्या एसआयटीला आणि त्यांच्या कारवाईला विरोध दर्शविण्यासोबतच इतर मागण्यांसाठी हे लेखणीबंद आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची कामे होऊ शकली नाही. वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया बंद राहीली. विद्यार्थ्याच्या सोयीसुविधेवर परिणाम झाला असून जात पडताळणी प्रमाणपत्र तयार करण्याचे काम बंद राहीले. तसेच शिष्यवृत्तीचे काम होऊ शकले नाही. मागण्यांमध्ये भारत सरकार मेट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क तसेच इतर सर्व योजनांचा फेरआढावा घेवून कामाची व्याप्ती पाहून अधिक मनुष्यबळाची नियुक्ती करावी. शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाची अधिसूचना, राज्य शासन निर्णय आणि आयुक्तालयाचे परिपत्रक यामध्ये तफावत असल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. सुधारीत शासन निर्णय तत्काळ काढण्यात यावे, शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काचे प्रदान, एसआयटीमार्फत होत असलेल्या चौकशीत सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या छळ करण्यात येत आहे ते थांबविण्यात यावे, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात यावी, संस्थाचालक व संबंधित अधिकारी यांचे मत मांडण्यासाठी नैसर्गिक न्यायाची संधी द्यावी, अनियमितता आढळल्यास अतिप्रदानाची रक्कम संबंधित संस्थेकडून वसुलीची कार्यवाही करण्यात यावी, मागासवर्गीय विद्यार्थी, संस्था आणि अधिकारी यांचा छळ होणार नाही याची खबरदारी घ्यावी, सामाजिक न्याय विभागासाठी क्षेत्रिय कार्यालयांना अधिकारी कर्मचारी पदसंख्येच्या सुधारित आकृतिबंद मंजूर करण्यात यावा, तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रस्ताव निकाली काढावा, सामाजिक न्याय विभागातील ४० टक्के जागा रिक्त असल्याने कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे, सरळ सेवेने पदे तत्काळ भरण्यात यावी, जिल्हास्तरावरील जात पडताळणी समितीचे गठण करण्यात यावे, प्रादेशिक उपायुक्त हे पद सहआयुक्त दर्जाचे करण्यात यावे, तीन वर्षाचा सहआयुक्त म्हणून अनुभव असलेल्या व्यक्तीला जात पडताळणी प्रमाणपत्राच्या समितीचे अध्यक्ष म्हणून नेमावे तर उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना पाच वर्षाचा अनुभव असल्यास त्यांना पात्र समजण्यात यावे अशा विविध मागण्यांना घेवून १ सप्टेंबरपासून ११ सप्टेंबरपर्यंत काळ्या फितीलावून काम करण्यात आल्या. परंतु आजपासून लेखनी बंद आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात सहायक आयुक्त प्रभाकर निकोडे, वानखेडे, विशाल कळमकर, राजेश निखोले, अजय वावणे, मनोहर सोनटक्के, राहुल राठोड, राजेश मेश्राम, राजेश नागुलवार, रामसिंग जाधव, समिक्षा दुधलकर, योगेश कडव, अनिल बोडे व इतर कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग होता. जिल्ह्यातील १०० कर्मचारी या लेखनीबंद आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाच्या नावे जिल्हाधिकारी यांंना देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)