शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

जिल्ह्यातील ११९ रस्त्यावर बसलाय यमराज, रस्त्यांसाठी ४२ कोटीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 3:33 PM

आठ पूल कोसळण्याच्या मार्गावर : निद्रावस्थेत प्रशासन जागे होणार का?

नरेश रहिले लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दररोज लाखो लोकांची वर्दळ असलेल्या जिल्ह्यात ११९ रस्त्यांची हालत खस्ता झाल्याची कबुली खुद्द जिल्हा परिषद देत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. या रस्त्यांवर यमराज टपून बसला आहे. या रस्त्यांच्या बांधकामासाठी ४२ कोटी ५३ लाख रुपये लागणार असल्याने ती मागणी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे केली आहे.

जिल्ह्यातील ११९ रस्त्यांवर प्रत्येकी एक किलोमीटरच्या आत शेकडो खड़े आहेत. हे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत. एक खड्डा वाचविण्याच्या नादात वाहन दुसऱ्या खड्ड्यात जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी पाऊल उचलत नाही. या रस्त्यावर बसलेला यमराज कधी कुणाचा बळी घेईल हे सांगता येत नाही. या खड्ड्यांमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे. 

अधिकाऱ्यांना दौऱ्याप्रसंगी रस्ते दिसत नाही काय? जिल्ह्यातील ११९ रस्ते जीर्ण झाले असून, अपघाताला आमंत्रण देत आहेत, अशी कबुली जिल्हा परिषद देत असताना जिल्ह्यात दौऱ्यावर जाणाऱ्या पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यासह सर्वच लहान- मोठ्या अधिकाऱ्यांना हे रस्ते दिसत नाही काय, असा सवाल नागरिक करीत आहेत. रस्त्यांची हालत खस्ता झाली असून, या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पुढे येत नाही. येथील रस्त्यांवर मोठे खड़े असून, त्यावरून वाहन चालविताना वाहनाचे संतुलन बिघडते. 

१६४ पूल, रस्ते, नाली जीर्ण तालुका                         नादुरुस्त रस्ते       पूल              मोरी गोंदिया                              २३                        ००               ०१ गोरेगाव                             १५                        ००               ०० तिरोडा                              ०४                        ००               ०७ आमगाव                            ०५                        ००               २२ सालेकसा                           १२                        ०५               ०६ देवरी                                २६                        ०१                ०१ अर्जुनी-मोरगाव                 १७                        ००                ०० सडक-अर्जुनी                   १७                        ०२                 ००

किती बळी घेणार?रस्त्यांवरील खड्यांमुळे अनेकांचा बळी गेला. उदासीन असलेल्या प्रशासनाने जागे व्हावे हा नागरिकांचा सूर आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांनी अनेकांचा जीव घेतला. हा रस्ता आणखी किती बळी घेणार, असा सवाल नागरिक करीत आहेत. 

४२.५३ कोटींची मागणीया कामांसाठी लागणारा निधी ४२ कोटी ५३ लाख एवढा आहे. या निधीची मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे केली आहे. यापूर्वी तीन कोटी ८९ लाख ६० हजार रुपये खर्च करून रस्ते व पूल बांधण्यात आले आहेत.

 

टॅग्स :gondiya-acगोंदियाroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा