आॅनलाईन लोकमतगोंदिया : ज्या जिल्हा परिषद शाळेत चांगले शिक्षण दिले जात आहे. तेथील विद्यार्थी संख्या वाढत आहे. परंतु ज्या शाळेत चांगले शिक्षण दिले जात नाही त्या शाळेतील पटसंख्या घटत असल्याचा शासनाचा समज आहे. शासनाने ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ३१ शाळा बंद होण्याच्या मार्गावर होत्या. परंतु जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने यंदा ह्या ३१ शाळा बंद न करण्याचा ठराव घेतला आहे.सामाजिक कारणांमुळे राज्यातील काही शाळांची पटसंख्या अत्यंत कमी झाली आहे. ज्या शाळांतील पटसंख्या कमी आहे, त्या शाळांतील विद्यार्थ्यांचे सामाजिकरण करण्यास अडचण येत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ व महाराष्टÑ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २०११ च्या तरतूदीचे उल्लंघन होऊ नये म्हणून या शाळांतील विद्यार्थ्यांना जवळच्या गुणवत्तेच्या शाळेत समायोजित करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३२ शाळा ह्या १० पटसंख्या पेक्षा कमी असल्याने त्या बंद करण्यात येणार होत्या.आमगाव तालुक्यातील ६, सालेकसा तालुक्यातील ५, देवरी तालुक्यातील ४, सडक-अर्जुनी तालुक्यातील ७, गोरेगाव तालुक्यातील २ व तिरोडा तालुक्यातील एक शाळा बंद करण्यात येणार होती. परंतु यंदाचे सत्र संपायला केवळ ४ महिन्याच्या कालावधी असल्याने विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांनाही त्रास होऊ नये,यासाठी यंदाचे चार महिने त्या ३१ शाळा त्याच ठिकाणी सुरू ठेवण्याचा ठराव शिक्षण समितीने घेतला आहे.सभापती पी. जी. कटरे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जि. प. सदस्य लता दोनोडे, माधुरी पाथोडे, सिमा मडावी, रजनी गौतम, प्रिती रामटेके, गिरीश पालीवाल, राजेश भक्तवर्ती व सर्व तालुक्यातील सगळे गटशिक्षणाधीकारी उपस्थित होते.दोन शाळांचे अंतर तीन किमी१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करून त्या शाळेतील विद्यार्थी दुसºया शाळेत समायोजित करण्याचे शासनाने ठरविले. परंतु बंद शाळातील विद्यार्थी ज्या शाळेत समायोजित करीत असतील त्या शाळेचे अंतर बंद होणाºया शाळेतपासून एक किमी असावे असे ठरविण्यात आले. परंतु जिल्ह्यातील बंद होणाºया शाळांपैकी जरूघाटा या शाळेतील विद्यार्थी प्रतापगड शाळेला जोडल्यास हे अंतर ३ किमी तर खोळदा शाळा वडेगाव रेल्वेला जोडण्यात आली असून हे अंतर ३ किमी आहे. त्यामुळे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.या शाळांना दिलासाजि.प. प्राथ. शाळा जुनेवानी, डोंगरगाव सि., जरूघाटा, सुरगाव, शिकारीटोला, ढिवरटोला, नवाटोला, वाघाटोला, चिंताटोला, भोयरटोला, मूरपारटोला, गुरूटोला, चुडुरका, हौसीटोली, गराडा, आदिवासीटोली, खोलडा, सलंगटोला, टेमणी, हेटीटोला रामाटोला, हलबीटोला, गोंडीटोला, खामतलाव, सरेगाव, दसरूटोला, देवरी तालुक्याचा नवाटोला, सोनोली, पांढरवानी, सितेपार, मरामजोब, डव्वा व जांभळी पोरका या शाळांना चार महिन्यासाठी दिलासा मिळाला आहे.डोंगर-दरी, वाड्या-पाड्यावरील शाळांतील विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत पाठविण्यासाठी पालकांना त्रास सहन करावा लागणार होता. जिल्ह्यातील बंद झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत समायोजित केल्यास चिमुकल्यांना तीन-तीन किमी अंतरावर जावे लागेल. यासाठी शाळा बंद करू नये असा ठराव शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला.-पी.जी.कटरेशिक्षण सभापती जि.प. गोंदिया.
‘त्या’ ३१ शाळांना यंदा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 10:25 PM
ज्या जिल्हा परिषद शाळेत चांगले शिक्षण दिले जात आहे. तेथील विद्यार्थी संख्या वाढत आहे. परंतु ज्या शाळेत चांगले शिक्षण दिले जात नाही त्या शाळेतील पटसंख्या घटत असल्याचा शासनाचा समज आहे.
ठळक मुद्देशिक्षण समितीचा निर्णय : पुढच्या वर्षी पटसंख्या वाढविण्यावर भर