शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

रंगारी यांना यंदाचा साहित्य सन्मान

By admin | Published: February 26, 2016 2:05 AM

श्यामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान साकोलीचा यंदाचा साहित्य सन्मान युवा साहित्यकार प्रा. मिलिंद रंगारी यांना सोमवार (दि.२२) प्रदान करण्यात आला आहे.

सालेकसा : श्यामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान साकोलीचा यंदाचा साहित्य सन्मान युवा साहित्यकार प्रा. मिलिंद रंगारी यांना सोमवार (दि.२२) प्रदान करण्यात आला आहे.झाडीबोली साहित्य मंडळांतर्गत पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या साहित्यकारांना हा पुरस्कार दिला जातो. मिलिंद रंगारी हे पंचशील कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला येथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी झाडीपट्टी क्षेत्रातील जीवनशैली, राहणीमान, खानपान, संस्कृती, सामाजिक सलोखा, कौटुंबिक समस्या व तडजोड या विषयांना स्पर्श करीत अनेक लेख, नाटक, कविता यांची रचना केली आहे. यासर्व बाबींचा विचार करत यंदा त्यांना साहित्य सन्मान प्रदान करण्यात आले. श्यामराव बापू कापगते स्मृती प्रतिष्ठानतर्फे श्री संत विदेही मोतीराम बाबा आत्मप्रवर्तक मंडळ भूगाव येथे पंढरपूर विठ्ठल रूखमाई मंदीर सभागृहात संत अमरत्न तवाडे बाबा यांच्या अध्यक्षतेखाली माजी आ. हेमकृष्ण कापगते आणि झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आरमोरीचे आ. कृष्णा गजबे, माजी आ. वसंत बोडें, माजी आ. अतुल देशकर, भंडारा जि.प.अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, हृदय शल्य चिकीत्सक डॉ. पुरूषोत्तम देशपांडे, शिक्षण महर्षी डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, इंजि.उमाशंकर पर्वते, बिंदल अग्रवाल, सरपंच दुधराम बारस्कर, पोलीस पाटील माधुरी बारस्कर, हिरालाल झोडे व इतर मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)