लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टरवर धानासह अन्य पिकांची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामासाठी खते, बियाणांची गरज लक्षात घेवून त्यादृष्टीने तयारी केली आहे.मृगाचा पाऊस बरसल्यानंतर शेतकरी पेरणीला सुरूवात करतो. मात्र मागील दोन तीन वर्षांचा अनुभव पाहता मृगाचा पाऊस बरसतच नसल्याने पेरण्या लांबणीवर जात असल्याचे चित्र आहे.मागील वर्षी पावासाने पाठ फिरविल्याने उत्पादनात ५० ते ६० टक्के घट झाली. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. सततची नापिकी व दुष्काळामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले असताना बळीराजा पुन्हा मोठ्या आशेने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.मृगाचा पाऊस बरसण्यापूर्वी शेतीच्या मशागतीची कामे पूूर्ण व्हावी. यासाठी शेतकरी संपूर्ण कुटुंबासह पहाटेपासूनच शेतात राबताना दिसून येत आहे. सध्या शेतकरी शेतीमध्ये नांगरणी आणि वखरणी पूर्ण करुन व शेणखत टाकून शेतीच्या मशागतीची कामे करीत पूर्ण आहे. दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या वाढत्या डोंगराचे बळीराजाला टेशंन असले तरी तो पुन्हा नव्या उमेदीने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. कृषी विभागाने सुध्दा खरीप हंगामात एकूण क्षेत्रावर होणारी विविध पिकांची लागवड लक्षात घेवून त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.जिल्ह्यात एकूण २ लाख २० हजार २४६ हेक्टर लागवड योग्य क्षेत्र असून त्यापैकी यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन केले आहे.यामध्ये सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून त्यापाठोपाठ, तूर, उडीद, मूंग या पिकांची लागवड केली जाणार आहे. खरीपासाठी ५५ हजार क्विंटल बियाणांची मागणी कृषी विभागाने महाबीजकडे केली आहे. तर खरीपा दरम्यान खताची मागणी लक्षात घेवून ६४ हजार मेट्रीक टन खताची मागणी केली आहे.
यंदा खरीपचे १ लाख ९१ हजार हेक्टरवर नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 9:00 PM
यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टरवर धानासह अन्य पिकांची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामासाठी खते, बियाणांची गरज लक्षात घेवून त्यादृष्टीने तयारी केली आहे.
ठळक मुद्दे६४ हजार मेट्रीक टन खताची मागणी : बळीराजा लागला कामाला