बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. हेमंत पटले, प्रदेश सचिव माजी आ. संजय पुराम, माजी आ. रमेश कुथे, भंडारा-गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख वीरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी व जिल्हा महामंत्री मदन पटले उपस्थित होते. मानकर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्त अनेक ठिकाणी शिबिरे आयोजित केली जाणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तम आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्त्व लोकांना पटवून दिले जाणार आहे. २३ जून रोजी जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन 'बलिदान दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार असून, ६ जुलै त्यांच्या जयंती दिनापर्यंत पंधरवड्यात जिल्ह्यातील सर्व बूथवर वृक्षारोपण, लॅस्टिकमुक्ती, जलाशय स्वच्छता, स्वछता अभियान, लसीकरण जनजागृती आदी सेवाकार्य केले जाणार आहे. स्वातंत्र्योत्तर इतिहासातील 'काळे पर्व' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणीबाणीद्वारे काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली. त्यामुळे जिल्ह्यात २५ जून हा आणीबाणीविरोधी काळा दिवस पाळण्यात येणार आहे. तसेच २७ जून हा महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मन की बात' हा कार्यक्रम प्रत्येक बूथवर व सार्वजनिक ठिकाणी कार्यकर्त्यांद्वारे सामूहिक पद्धतीने ऐकविला जाणार आहे. तर ६ जुलै रोजी डॉ. मुखर्जी जयंतीनिमित्त जिल्ह्यात बूथस्तरावर कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
योग दिन ते डॉ. मुखर्जी जयंतीपर्यंत भाजपचे विविध कार्यक्रम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:20 AM