लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील हाजराफॉल येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी तीन मित्रांसह आलेल्या गोंदिया येथील युवकाचा हाजराफॉलच्या पहाडीवरील विहिरीत पडून मृत्यू झाला.ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. हेमंत श्यामजी साते (१८) रा.मरारटोली गोंदिया असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.हेमंत साते यंदाच बारावीतून उत्तीर्ण झाला. रविवारी त्याचा वाढदिवस होता. तो आपल्या मित्रांसह बाहेर साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी वाढदिवस साजरा करण्यासाठी तो त्याचे मित्र अभय नरेश जांभरे (१७) रा. न्यु लक्ष्मीनगर गोंदिया, हर्ष छबिन्द्र वाघमारे (१७) रा. नारायणनगर कुडवा आणि अवि उर्फ योगेश सुखराम मटाले (१७) रा.मरारटोली गोंदिया असे चौघेजण सायंकाळी ५ वाजता आधी हाजराफॉल येथे आले.हाजराफॉल परिसर फिरुन त्यांनी खालील तलावात आंघोळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु येथे पर्यटकांना आंघोळ करण्याची मनाई असून हाजराफॉलच्या स्वयंसेवकांनी त्या चौघांना मज्जाव केला.त्यानंतर हाजराफॉलला प्रवेश करण्याची वेळ संपली. स्वयंसेवकांनी सर्व पर्यटकांना हाजराफॉल परिसरातून बाहेर काढीत संपूर्ण परिसर रिकामा केला.परंतु हेमत साते आणि त्याच्या तिन मित्रांनी स्वयंसेवकांची नजर चुकवून रेल्वे ट्रॅककडे जाऊन खुल्या बोगद्याच्या मार्गाने हाजराफॉलच्या पहाडावर चढले. ज्या ठिकाणाहून धबधब्याचा पाणी खाली पडते त्या ठिकाणी पोहचले. त्याचे तिघे मित्र नाल्याकडे आंघोळ करायला गेले आणि हेमंत हा धबधब्याचा पाणी खाली पडण्याचा ठिकाणी पहाडीवरील खोल विहिरीसारख्या खड्यात आंघोळ करायला गेला. परंतू त्याला तिथे खोल खड्डा असल्याची कल्पना नव्हती. त्यामुळे तो सरळ त्या खड्यातील पाण्यात पडला त्यामुळे तो पाण्यात बुडू लागल्याने त्याने आरडाओरड केली, हे ऐकून त्याचे मित्र धावत आले.परंतु तोपर्यंत तो खोल विहिरीत बुडाला होता. त्यांनी इकडे तिकडे संपर्क केला. त्यानंतर ही माहिती पोलीस स्टेशनला स्वयंसेकांनी दिली. सालेकसा पोलिसांनी त्या तीन मित्रांना सोबत घेऊन हेमंतचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र रात्री उशीरापर्यंत त्याचा पत्ता लागला नव्हता. त्यानंतर सोमवारी सकाळी ८ वाजता कहाली येथील ढिवर समाजाचे मच्छिमारांना पाचारण करुन हेमंतचा हाजराफॉल येथे शोध घेण्यात आला. त्यानंतर हाजराफॉल धबधब्याच्या खोल खड्डयातून हेमंतचा मृतदेह बाहेर काढला. सालेकसा पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला.प्रकरणाची तपास ठाणेदार राजकुमार डुणगे करीत आहेत.निर्देशांचे पालन न करणे जीवावर बेतलेमागील पाच वर्षात हाजराफॉल येथे एक ही अपघात किंवा इजा झाल्याची घटना घडली नव्हती.नवाटोला येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून येथे स्वयंसेवक मुले-मुली सतत सतर्कता बाळगत आहे. पर्यटकांना येथे आंघोळ करणे किंवा वर पहाडावर जाण्यास मनाई आहे. सदर युवकांनी निर्देशाचे पालन न करता वर पहाडावर गेले आणि हीच बाब त्यांच्या जीवावर बेतली.
हाजराफॉल येथे तरुणाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:51 PM
तालुक्यातील हाजराफॉल येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी तीन मित्रांसह आलेल्या गोंदिया येथील युवकाचा हाजराफॉलच्या पहाडीवरील विहिरीत पडून मृत्यू झाला.ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. हेमंत श्यामजी साते (१८) रा.मरारटोली गोंदिया असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
ठळक मुद्देवाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते मित्र