- सुनंदा हुकरे, तेढा (ता. गोरेगाव)
.....................
भारत स्वतंत्र झाला त्या गोष्टीला ७५ वर्ष लोटले तरी आजच्या तरुणांमध्ये देशभक्ती तेवढीच आहे. भारतीयांच्या मनात देशासंदर्भातील प्रेम अफाट आहे. शत्रूला त्याची औकात दाखविण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा प्रत्येक भारतीय जाती, धर्म, पंथ व लिंग विसरून देशासाठी लढवय्या म्हणून पुढे येतो. देशाच्या विकासाच्या पायाभरणीत तरुणांचा सिंहाचा वाटा आहे.
- जगदीश चुटे, पदमपूर
.....................
देश स्वतंत्र झाला तेव्हा देशातील बहुतांश महिला चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित होत्या. परंतु आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करीत आहे. उद्योग जगतापासून तर देशातील राजकारणात सर्वोच्च पदाचा मानही महिलांनी भूषविला आहे. स्त्रीशक्ती एकवटली तर मोठमोठी कामेही त्या सहजरित्या करतात.
- अर्चना चिंचाळकर, आमगाव