शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

वनविभागाची रोपे आपल्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2017 1:06 AM

शासनाने लोकसहभागातून १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे.

प्रत्येक तालुक्यात स्टॉल : सवलतीच्या दरात मिळणार रोपे लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासनाने लोकसहभागातून १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. गोंदिया जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी वन विभागाने रोपे आपल्या दारी ही योजना आखली असून विविध ठिकाणी स्टॉल उभारण्यात येणार आहेत. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विविध जातीची रोपे सहज उपलब्ध व्हावी यासाठी २५ ते ३० जून या कालावधीत आपल्या दारी ही योजना राबविली जाणार आहे. या योजनेअंतर्गत तालुका गोंदिया व गोरेगाव करीता वन विभागीय कार्यालय गोंदिया, अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध व गोठणगाव करीता वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी-मोरगाव, आमगाव व सालेकसा करीता वनउपज तपासणी नाका आमगाव, सडक-अर्जुनी, कोहमारा, नवेगावबांध महामार्गकरीता वनपरिक्षेत्र कार्यालय वन्यजीव विभाग कोहमारा राष्ट्रीय महामार्ग तसेच तिरोडा करीता वनपरिक्षेत्र कार्यालय तिरोडा या ठिकाणी हे स्टॉल लावण्यात येणार आहेत. या स्टॉलवर रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यात गुलमोहर, अशोका, पेल्टाफार्म, बाहावा, करुकरंज, रेन्ट्री, सप्तपर्णी, जारूळ ही रोपे ११ रुपये प्रती रोपे तसेच बदाम, सीताफळ, कवठ, बोर, पेरु, रामफळ, मुंगना, चिंच, आवळा, बेहडा, मोहा ही रोपे ६ रुपये प्रती रोपे तसेच बांबू व सागवन रोपे ७ रुपये प्रती रोपे दराने उपलब्ध राहणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या दृष्टीने नागरिकांना हरितसेना सदस्य नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी आपले ओळखपत्र सोबत घेवून स्टॉलवर संपर्क साधावा. तसेच रोपे कुठे लावायची आहेत याची माहिती द्यावी, रोपे आपल्या दारी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपवनसंरक्षक यांनी केले आहे.