मनोहर हा आई ऊर्मिला, पत्नी कविता, १३ वर्षाचा मुलगा हर्षल, ९ वर्षांचा मुलगा जयंत असे पाच जण एकत्र राहात होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी मनोहरवर आली होती. मोलमजुरी हाती आलेले काम करून तो आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळीत होता. घटनेच्या दिवशी तो कामावर गेला नाही. आई व पत्नी मजुरीवर कामाला गेले होते. दोन्ही मुले शाळेत गेली होती. घटनेपूर्वी त्याने पत्नीसोबत बोलून घरी केव्हा येणार अशीही विचारणा केली. घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्यांनी घरातील धाब्याच्या मयालीला गळफास लावून आत्महत्या केली. मुलगा घरी आल्यावर आतून कडी लावल्याचे लक्षात आले. त्याने आईला बोलावून आणले. पत्नी घरी येताच आतील कडी काढल्यानंतर मनोहर गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. या घटनेची माहिती अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस निरीक्षक महादेव तोंदले, सपोनि सोमनाथ कदम, बीट अंमलदार इस्कापे, कोरे, पुण्यप्रेडीवार घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.
............
कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या
पोलीस तपासात मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली. त्यात माझ्यावर गावातील काही लोकांचे पैसे आहेत. जवळ पैसे नाही त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे मनोहरने या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवल्याचे बोलले जात आहे.