गोंदिया : जिल्ह्यात मध्यंतरी लागलेल्या लसीकरणाने आता पुन्हा एकदा गती घेतली असून आतापर्यंत जिल्ह्याने लसीकरणाचा ५३.४६ टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील ६९४७७५ नागरिकांचे आतापर्यंत लसीकरण झाले आहे.
लसीकरणात जिल्हा सुरुवातीपासूनच राज्यात अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने चांगलीच व्यवस्था केली असून परिणामी नागरिकांना लसीकरणासाठी अन्यत्र जावे लागत नसल्याचेही दिसून येत आहे. जिल्ह्यातील ६९४७७५ नागरिकांनी लस घेतली असून जिल्ह्याने लसीकरणाचा ५३.४६ टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये ५४१८०३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ४१.६९ एवढी टक्केवारी आहे. तर १५२९७२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची ११.७७ एवढी टक्केवारी आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यात आतापर्यंत १८-४४ गटात २५७१२७ तरुणांनी लस घेतली असून यात २२२५५४ तरुणांनी पहिला डोस तर ३४५७३ तरुणांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५-६० गटात २४९०१६ नागरिकांनी लस गेतली असून यामध्ये १८७१३७ नागरिकांनी पहिला डोस तर ६१८७९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ६० प्लस गटात १३५२३५ नागरिकांनी लस घेतली असून यामध्ये ९७५१४ नागरिकांनी पहिला डोस तर ३७७२१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकंदर लसीकरणात तरुणांची आघाडी दिसून येत आहे.
--------------------------
दुसऱ्या डोस घेणाऱ्यांची संख्या कमीच
जिल्ह्यात एकीकडे जेथे ६९४७७५ नागरिकांचे लसीकरण झाले असून यामध्ये ५४१८०३ नागरिकांनी पहिला डोस घेतल्याचे दिसत असून त्यांची ४१.६९ एवढी टक्केवारी आहे. तेथेच दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १५२९७२ एवढी असून त्यांची टक्केवारी फक्त ११.७७ आहे. यावरून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी दिसत असून नागरिकांकडून दुसरा घेण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
-----------------------------
लसीकरणात महिलांचीच आघाडी
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या लसीकरणात सुरुवातीपासूनच महिला अग्रेसर दिसून येत आहे. तीच स्थिती आताही असून महिलांची आघाडी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५०५६४ महिलांनी लस घेतली असतानाच ३४४२११ पुरुषांनी लस घेतली आहे.