सरपंच चौधरी यांचे आवाहन : राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे रासेयो शिबिर साखरीटोला : शिक्षण हे संस्काराचे उत्तम साधन आहे. शिक्षणातूनच सुसंस्कारीत पिढी तयार करता येते. आजचे तरुण या देशाचे भवितव्य आहेत. तरुण वर्गाने नेहमी जागृत राहावे, उच्च शिक्षण घेऊन देशाची सेवा करण्याचे ध्येय बाळगावे, राष्ट्रापती प्रेमभावना ठेवावी, आपल्या कृती व आचरणातून राष्ट्रहिताचे कार्य करावे, सध्याच्या संगणक युगात तरुणांनी डिजिटल बनावे, असे विचार सरपंच नोहरलाल चौधरी यांनी केले. बॅरि. राजाभाऊ कला कनिष्ठ महाविद्यालय साखरीटोला (सातगाव) येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर कवडी (ता.आमगाव) येथे आयोजित रासेयोच्या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. शिबिराचे उद्घाटन कवडीचे सरपंच नोहरलला चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य सागर काटेखाये, उपसरपंच सुरजलाल चौधरी, अंगणवाडी सेविका रहांगडाले, प्रा.व्ही.एस. दखने, रासेयो समन्वयक प्रा. गणेश भदाडे, कमलेश बोपचे, भावे, प्रा. प्रकाश दोनोडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात चालते-बोलते विद्यापीठ सत्र गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. सात दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबविले. यात स्वच्छता अभियान, पर्यावरणाचे संरक्षण, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, अशी जनजागृती करण्यात आली. स्वच्छ गाव, स्वच्छ भारत ही संकल्पा मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात झाडू लावून स्वच्छता केली. गावात प्रभात फेरी काढून विविध विषयावर जनजागृती केली. विशेष करुन ‘हागणदारी मुक्त गाव’ ही संकल्पना राबविण्यात आली. प्रत्येकाने शौचालयाचा वापर करावा, यासाठी प्रबोधन करण्यात आले. शिबिरात एड्स, सिकलसेल तसेच विविध आजारावर मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात आली. यावेळी उपसरपंच सुरजलाल चौधरी यांनी रासेयोच्या माध्यमातून कशी शिस्त लागते. रासेयोच्या माध्यातून कशी जनजागृती करतात याची माहिती दिली. यावेळी सांस्कृतीक कार्यक्रम, विविध स्पर्धा घेण्यात आल्या. वादविवाद, नाटक, इत्यादी कार्यक्रमातून मनोरंजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रमसंस्काराचे महत्व जाणून घेतले. शेवटच्या दिवशी समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा.व्ही.एस. दखने, प्रा.एम.आय. बडगे, प्रा. सुनील वाघमारे, प्रा.ज़ी.एस. भदाडे, प्रा.केंद्रे, अध्यक्षा मुक्ता भांडारकर, नंदू ब्राम्हणकर, खुशबू चकोल, रोहीत पांडे, विजय कोरे, कमलेश खोटेले, कल्याणी भांडारकर, पल्लवी शहारे, अक्षय उईके, पंकज शेंडे, नामदेव भोष्कर, माधोराव कुंभलवार, मोहिता भांडारकर, प्रियंका चुटे, प्रतिमा भगत, सविता ठाकरे व रासेयोच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
तरुणांनी राष्ट्रहितासाठी कार्य करावे
By admin | Published: January 23, 2017 12:22 AM