ऑनलाईन लोकमत्नेगोंदिया : भविष्यात चुलोद परिसरातील युवकांना रोजगारोन्मुख शिक्षण देण्याच्या दृष्टीने चुलोद जवळील ग्राम आसोली येथे शासकीय संस्थेची स्थापना करण्यात येईल. त्यामुळे चुलोदसह पसिरातील आठ ते दहा गावांतील युवकांना लाभ होईल, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.ग्राम चुलोद येथे २० लाख रूपये खर्चाच्या आखर चौक ते ढिवर मोहल्ला ते टेमनी रोडपर्यंत रस्ता डांबरीकरण बांधकामाचे भूमिपूजन आ. अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.आ. अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रात सर्वात चांगले रस्ते तयार करण्यात आले. लहानमोठ्या गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे.चुलोद येथे तलाव खोलीकरणाचे काम पूर्ण झाल्याने जलसाठ्याची क्षमता वाढली. रस्ते बांधकामातून गावोगावी उद्योग-धंदे पोहोचावे, हा आमचा लक्ष्य आहे. चुलोद केंद्रीय ग्राम म्हणून विकसित झाला आहे.पाटीलटोला (टेमनी)-चुलोद दरम्यान १.५ किमी रस्त्याच्या बांधकामासही शासनाने मंजुरी दिली आहे. लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. तसेच मागील ५० वर्षांपासून उपेक्षित कालव्यांच्या दुरूस्तीचे काम तीनचार महिन्यांपासून युद्धस्तरावर सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी संकटापासून मुक्ती मिळेल.तसेच यामुळे जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील १६३ गावांतील ३५ हजार ७१८ हेक्टर जमिनीच्या सिंचनासाठी पाणी मिळेल. तर गोंदिया तालुक्यातील ११ हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळून आर्थिक संपन्नता येईल, असे ते म्हणाले. याप्रसंगी जि.प. सभापती रमेश अंबुले तसेच उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे होत्या. अतिथी म्हणून पं.स. उपसभापती चमन बिसेन, जि.प. सदस्य विठोबा लिल्हारे, पं.स. सदस्य इंद्रायनी धावडे, भास्कर रहांगडाले, सरपंच लतिश बिसेन, उपसरपंच विनोद बबानेवार, पोलीस पाटील कविता भालाधरे, खडकसिंग बघेले, पुरूषोत्तम बघेले, घनश्याप पटले, संदेश भालाधरे, विजय ठाकूर, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष उमाशंकर ठाकूर, तंमुसचे अध्यक्ष पिंटू बनकर, ग्रा.पं. सदस्य ठानसिंग ठाकूर, ग्रा.पं. सदस्य देवेंद्र कोल्हे, मोहनलाल बरईकर, बाबुलाल राउत, कमलदास चंद्रिकापुरे तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
युवकांना रोजगारोन्मुख शिक्षण मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:09 AM
भविष्यात चुलोद परिसरातील युवकांना रोजगारोन्मुख शिक्षण देण्याच्या दृष्टीने चुलोद जवळील ग्राम आसोली येथे शासकीय संस्थेची स्थापना करण्यात येईल.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : शासकीय शिक्षण संस्थेची होणार स्थापना