सर्वप्रथम मुख्याध्यापकांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थिनींनी शारदा स्तवन सादर केले. याप्रसंगी विशाखा मुनिश्वर, वैशाली पुसाम यांनी गुरुपौर्णिमेच्यानिमित्त आपल्या भाषणात गुरुंची महती सांगितली. सुरभी आगाशे हिने गुरुंचे गौरव गीत सादर केले. मुख्याध्यापक मेश्राम यांनी, लोकमान्य टिळक यांच्या कार्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. मानवी जीवनात आई-वडील आणि गुरूचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी आई-वडील व गुरुंचा आदर करावा. नम्रपणा माणसाला मोठे करण्यासाठी निश्चितच महत्वपूर्ण आहे. आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुचा मोठा वाटा असतो. शिक्षकांनी आदर्श विद्यार्थी घडविण्याचे महान कार्य करावे असे आवाहन केले. संचालन सुरभी आगाशे हिने केले. आभार विशाखा मुनिश्वर हिने मानले. कार्यक्रमासाठी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सुनंदा मारबते, जी. आर. निंबेकर यांनी सहकार्य केले.
जिल्हा परिषद हायस्कूल (गुरू)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:18 AM