लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवजात व बाल मृत्यूदरात घट आणण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू ठेवण्यात आले. देशात ५ वर्षापर्यंतच्या बालकांचा मृत्यूचे मुख्य कारण डायरिया आहे. १० टक्के बालके डायरियाने दगावतात. मृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात अधिक होते. डायरियावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात २८ मे ते ९ जूनपर्यंत विशेष अतिसार (डायरिया) नियंत्रण पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले. या पंधरवाड्यात जिल्ह्यातील ५ वर्षापर्यंतच्या ९९ हजार ३९२ बालकांना ओआरएस व झिंक टॅबलेट दिली जाणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मातांना ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या कुंभारटोली, घोगरा, येरंडी गावात अतिविशेष मिशन इंद्रधनूष अभियान आयोजित करण्यात आले आहे. अपूर्ण टिकाकरण व टिकाकरण न झालेल्या बालकांचा व गर्भवती मातांचे सर्वेक्षण करून संपूर्ण टिकाकरण करण्याचे निर्देश जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत दिले.या बैठकीत मुकाअ डॉ. राजा दयानिधि, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी. निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, समाज कल्याण अधिकारी एम.आर.रामटेके, सहायक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विजय तितिरमारे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, साथरोग अधिकारी डॉ. बी. आर.पटले, तालुका आरोग्य अधिकरी डॉ. सी. आर. वंजारे, डॉ.गगन गुप्ता, डॉ.शीतल मोहबे, डॉ. ललित कुकडे, डॉ.दिनेश ब्राह्मणकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.डॉ.दयानिधी म्हणाले, नियमित टिकाकरण कार्यक्रमात प्रत्येक गावात टिकाकरण सत्राचे आयोजन करून सर्व गर्भवती माता व बालकांना सर्व पध्दतीने सुरक्षित केले जाईल. उर्वरीत गावांत अपूर्ण व टिकाकरण न झालेल्या बालक व गर्भवती मातांचे सर्वेक्षण करून टिकाकरण केले जाणार आहे.६७ हजार बालकांचा समावेशजिल्ह्यातील एकूण लोकसंख्या १३ लाख ३६ हजार २२१ आहे. यातील ९५ हजार ९२७ कुटुंबातील ५ वर्षातील ९९ हजार ३९३ बालकांना ओआरएस व जिंक टॅबलेट दिली जाणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील १८४६ आंगणवाडी व ११४० जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.
९९ हजार बालकांना देणार झिंक टॅबलेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:31 PM
नवजात व बाल मृत्यूदरात घट आणण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू ठेवण्यात आले. देशात ५ वर्षापर्यंतच्या बालकांचा मृत्यूचे मुख्य कारण डायरिया आहे. १० टक्के बालके डायरियाने दगावतात. मृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात अधिक होते.
ठळक मुद्देडायरिया पंधरवडा आजपासून : टॉस्कफोर्स समितीची बैठक