शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
2
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
4
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
5
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
6
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
7
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
8
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
9
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
10
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
11
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
12
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
13
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
14
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
15
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
16
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
17
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
18
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
19
‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’
20
मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

जि.प. शाळांवरील पालकांचा विश्वास व्यर्थ जाणार नाही

By admin | Published: April 09, 2016 1:45 AM

संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यातून ‘गुढी पाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ या उपक्रमांतर्गत बहुसंख्य पालकांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये ....

पी.जी. कटरे : ‘गुढीपाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ कार्यक्रम गोरेगाव : संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यातून ‘गुढी पाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ या उपक्रमांतर्गत बहुसंख्य पालकांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेऊन विश्वास दर्शविला. त्यांचा विश्वास व्यर्थ जाणार नाही. कारण उच्च दर्जा व गुणवत्ता आता जिल्हा परिषदेच्या शाळांत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांनी केले. जवळील ग्राम हिरडामाली येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने शुक्रवारी आयोजित तालुकास्तरीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, सरपंच कुंता बघेले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश कुंभलकर, अतुल कटरे, विस्तार अधिकारी टी.बी. भेंडारकर, एस.बी. खोब्रागडे, विषयतज्ज्ञ गोविंद ठाकरे, सुनील ठाकूर, जी.जे. बिसेन उपस्थित होते. जि.प.च्या शिक्षण विभागातर्फे गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर शाळा प्रवेश वाढविण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून हाती घेण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी २० हजार विद्यार्थी प्रवेशीत झाले असून प्रचंड उत्साह ग्रामीण भागात दिसून येत आहे. आज शिक्षणाची गुढी जि.प. शाळेत उभारली असून ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणारच अशी ग्वाही कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली. पंचायत समिती सभापती चौधरी यांनी, जिल्हा परिषद शाळेचा बदललेला दर्जा पाहून खूप आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक वाय.एस. भगत यांनी मांडले. संचालन राहुल कळंबे यांनी केले. आभार वीरेंद्र पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, शिक्षक अनमोल उके, विकास कोहाड, साधना पारधी, प्रियंका भरणे यांचेसह शाळेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)विद्यार्थ्यांचे साहित्य देऊन स्वागत गुढीपाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ या कार्यक्रमांतर्गत हिरडामाली शाळेतील केजी वन व वर्ग १ ला व नव्याने दाखल विद्यार्थ्यांना टॅब, फुगे, चॉकलेट, मनोरंजनात्मक शैक्षणिक पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्साहपूर्वक स्वागत करण्यात आले. भरतीसपात्र १०० टक्के विद्यार्थी गावातील शाळेतच दाखल झाले असून कोणताही विद्यार्थी बाहेरगावी जाणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेऊन जिल्हा परिषद शाळेवर विश्वास दर्शविला. बाहेर गावातील विद्यार्थी सुध्दा हिरडामाली शाळेत प्रवेश घेत आहेत.