शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

व्हॉटस अ‍ॅपच्या संदेशावरून जि.प. पदाधिकाऱ्यांत जुंपली

By admin | Published: July 06, 2016 2:05 AM

जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी जिल्हा परिषद सदस्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर आपली बदनामी ...

गोंदिया : जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी जिल्हा परिषद सदस्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी (दि.५) गंगाधर परशुरामकर यांचा जबाब नोंदविला. जिल्हा परिषद सदस्यांचा एक ग्रुप व्हॉट्सअ‍ॅपवर तयार करण्यात आला आहे. त्या ग्रुपवर परशुरामकर यांनी आपल्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याची तक्रार गहाणे यांनी केली. मात्र त्यांचा अपमान करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. आपण प्रचलित असलेल्या वाक्प्रचाराचा साध्या अर्थ्याने वापर केला होता, मात्र त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आल्याचे परशुरामकर यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषदेतील काही बांधकामे अडल्यामुळे जि.प. उपाध्यक्षांनी चिडून ही तक्रार केल्याचे काही जि.प. सदस्यांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दिड कोटीचे काम व जिल्हा वार्षिक योजनेच्या ३०५४ या शिर्षाखालील ३ कोटी ४० लाखांचे काम विभाग प्रमुखांनी मंजूर केले. ही कामे विषय समिती, स्थायी समिती किंवा सामान्य सभेत न ठेवताच मंजूर करण्यात आली. त्यानंतर २६ नोव्हेंबर २०१५ ला शिक्षणाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी मान्यता दिली. २९ जानेवारी २०१६ ला मंजूर झालेली कामे सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आली. आधी त्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यानंतर त्या कामांना सर्वसाधारण सभेत मांडले. त्यावर आक्षेप घेत जि.प. सदस्य सुरेश हर्ष व इतरांनी तक्रार केली होती. त्यावर मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविला होता. १२ जून रोजी झालेल्या सभेत विभाग प्रमुखांना खडसावत असले प्रकरण खपवून घेणार नाही. त्यासाठी अशी चूक पुन्हा करू नका, असे निर्देश स्थायी समितीच्या सभेत सीईओंनी विभाग प्रमुखांना दिले. या प्रकरणाची पडताळणी करण्यास अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी पाडवी यांना सांगून अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यानंतर जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे व शिक्षण सभापती पी.जी. कटरे हे मुकाअ यांच्या कक्षात चर्चा करण्यासाठी गेले. त्यावर परशुरामकर यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर कॉमेंट केल्याने सत्ताधारी आणि विरोधक पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली. (तालुका प्रतिनिधी)