शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

झाडीपट्टीच्या कलावंतांना लागले नाटकांचे वेध

By admin | Published: October 04, 2015 2:34 AM

विदर्भाची शान, मान आणि नाट्य कंपन्यांची खाण म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी आहे. दरवर्षी दिवाळीपासून झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांना सुरुवात होते.

मंडईची तयारी : नाटक कंपन्या लागल्या कामीबाराभाटी : विदर्भाची शान, मान आणि नाट्य कंपन्यांची खाण म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी आहे. दरवर्षी दिवाळीपासून झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांना सुरुवात होते. त्यासाठी झाडीपट्टीच्या रंगभूमीला नाटकांचे वेध लागणे सुरू झाले आहे. तालीम, सराव आणि नाटकांची झलक म्हणून या नाट्य कंपन्यांच्या नाटकांना हळूहळू रंग चढत आहे.सदर झाडीपट्टी रंगभूमी ही ‘झाडीवूड’ या नावाने प्रसिद्ध आहे. गडचिरोली-चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातील वडसा/देसाईगंज या शहरात झाडीपट्टी नाटकांच्या अनेक कंपन्या कार्यरत आहेत. ५०-६० नाट्य कंपन्यांची कार्यालये येथे सजली आहेत. यामध्ये चंद्रकला थिएटर्स, लोकजागृती रंगभूमी, चक्रधर स्वामी, धनंजय स्मृती, प्रशांत स्मृती, नटरंग लावण्य, प्रल्हाद रंगभूमी, रंगतरंग युवा रंगमंच, नटराज, महालक्ष्मी अशा कंपन्या सर्वपरिचित आहेत. सदर कंपन्यांची रंगीत तालीम, सराव करताना झाडीपट्टीतील कलाकारही येथे दाखल झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.भावगीत, प्रेमगीत, चरित्र अभिनय, हास्य अभिनव अशा विविध भूमिकांमध्ये अभिनय करण्यासाठी कलावंत पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, अमरावती अशा मोठ्या शहरातून येत असतात. नृत्य करणाऱ्या तरुणीसुद्धा हजेरी लावताना दिसतात. या झाडीपट्टी नाटकांना खरा रंग चढणार तो दिवाळीच्या पर्वावर. दिवाळीपासून मंडई बाजार गावोगावी भरविल्या जातो. याच निमित्ताने या नाट्य कंपन्यांची नाटके प्रबोधनाचे कार्य पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील गावागावात करतात. यामधूनच शहरातील कलावंतांबरोबर झाडीपट्टीचे कलाकारांना सुगीचे दिवस येते. (वार्ताहर)झाडीपट्टी कलावंतांची ख्याती महाराष्ट्राभरझाडीपट्टी रंगभूमीचे कलावंत सुरूवात जरी आपल्या भागातून करीत असले तरी त्यांच्या कलेचे सादरीकरण राज्यात अन्य भागातही आता होत आहे. त्यात प्रामुख्याने अनिरुद्ध वनकर, प्रा.शेखर डोंगरे, स्वर संगमकुमार, के. आत्माराम, डॉ.खुणे, कमलाकर बोरकर, युवराज प्रधान, शेखर पटले, किरपाल सयाम, राजा चिटणीस, ज्ञानेश्वरी कापगते, रागिनी बिडकर, भूमाला कुंभरे अशा प्रतिभावान कलाकार, गायक, लेखक, कवी, दिग्दर्शक, सिनेस्टार्सचा समावेश आहे.