शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

जि.प. व पं.स.ची आरक्षण सोडत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 5:00 AM

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निर्वाचक विभागाचे सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण सोडत ईश्वर चिठ्ठीने जाहीर करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) स्मिता बेलपत्रे उपस्थित होते. नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण न्यायालयाने स्थगित केल्यामुळे या जागा अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या करण्यात आल्या आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वोच्य न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने या जागा सर्वसाधारण करुन निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे गोंदिया जि.प.च्या १० आणि पं.स.च्या २० अशा एकूण ३० जागांसाठी ५० महिला आरक्षणासाठी गुरुवारी (दि.२३) सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निर्वाचक विभागाचे सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण सोडत ईश्वर चिठ्ठीने जाहीर करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) स्मिता बेलपत्रे उपस्थित होते. नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण न्यायालयाने स्थगित केल्यामुळे या जागा अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या करण्यात आल्या आहे. या जागांमधून सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १० विभाग राखीव होते ते आता सर्वसाधारण करण्यात आले. त्यातील ५ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. यात ५० टक्के म्हणजे ५ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. प्रियांशी रहांगडाले या चिमुकल्या मुलीच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीने सर्वांसमक्ष काढण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

असे आहे जि.प.च्या १० जागांचे आरक्षण - सर्वसाधारण जागांमध्ये घाटटेमनी, किकरीपार, निंबा, ठाणेगाव (महिला), पांढरी(महिला), बोंडगावदेवी, माहूरकुडा (महिला), ईटखेडा(महिला), महागाव(महिला), केशोरी या विभागाचा समावेश आहे. २९ पासून सुरू होणार निवडणूक प्रक्रिया - ओबीसी आरक्षित जागा सर्वसाधारण करून या जागांवर आता १८ जानेवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी २९ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर १९ जानेवारीला सर्वच जागांची मतमोजणी होणार आहे. 

जागा सर्वसाधारण; लढणार मात्र ओबीसी - सर्वोच्य न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे ३० जागा सर्वसाधारण करण्यात आल्या आहेत. जागा जरी सर्वसाधारण झाल्या अ सल्या तरी या सर्व जागांवर ओबीसी उमेदवारच देण्यात येणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तसा निर्णय घेतला असून, उमेदवारीसुद्धा ओबीसी उमेदवारांनाच देण्यासाठी नावे निश्चित केली आहेत. ओबीसी प्रवर्गावर अन्याय होऊ नये अशी सर्वच पक्षांची भूमिका आहे.

ब्रेक के बाद नेते लागले कामाला - ओबीसी प्रवर्गाच्या ३० जागा वगळून जि.प.  आणि पंचायत समितीची निवडणूक घेण्यात आली. यासाठी २१ डिसेंबरला मतदान पार पडले. आता २९ डिसेंबरपासून या ३० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारासह, सर्वच पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते ब्रेक के बाद पुन्हा कामाला लागले आहेत.३० जागांसाठी होणार काँटे की टक्कर - ओबीसी प्रवर्गाच्या ३० जागा सर्वसाधारण करून या जागांवर १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेसाठी या जागा महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा जोर या जागांवर असणार असल्याने या जागांवर काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद