लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जगभरात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर शासन आणि प्रशासनातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाय योजना केल्या जात आहे. याच पार्श्वभुमीवर गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या कार्यक्रमाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.१७) दिले. त्यामुळे मंगळवारपासून जि.प.निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.गोंदिया जि.प.आणि पंचायत समितीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कालावधी येत्या २० जुलै रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी जि.प.आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या जाणार होत्या. राज्य निवडणूक आयोगाने २८ फेब्रुवारीपासून जि.प.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार ५ मार्चला प्रारुप प्रस्तावास मान्यता, १३ मार्चला सर्कल निहाय आरक्षण सोडत, १६ मार्चला प्रभाग रचनेची अधिसूचना आणि १६ ते २३ मार्च दरम्यान प्रभाग रचना आणि आरक्षण नोंदविणे, ३० मार्चला आक्षेपावर सुनावणी आणि ३ एप्रिलला अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात येणार होते. या कार्यक्रमानुसार सोमवारपासून आरक्षणावर आक्षेप नोंदविण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली होती. मात्र सध्या देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. निवडणुका या भयमुक्त आणि शांततेच्या वातावरणात पाडणे लोकशाहीत अपेक्षित आहे.याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील जि.प.व पं.स.निवडणुकीच्या कार्यक्रमाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेत मंगळवारी यासंबंधिचे आदेश काढले आहे. हेआदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून यात जि.प.व पं.स.निवडणुकीचा कार्यक्रम जैसे थे स्थितीत ठेवण्याचे निर्देश दिले आहे.त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन महिने पुढे जाण्याची शक्यता आहे.पदाधिकाऱ्यांना मिळू शकतो तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळराज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार जून महिन्यात निवडणुका होणार होत्या. मात्र कोरोनामुळे निवडणुकीच्या कार्यक्रमाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.त्यामुळे या निवडणुका आता सप्टेबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जि.प.आणि पं.स.च्या विद्यमान पदाधिकारी आणि सदस्यांना तीन महिन्याचा अतिरिक्त कार्यकाळ मिळण्याची शक्यता आहे.मोर्चेबांधणीला मिळणार वेळकोरोनामुळे जि.प.निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.तर सर्कल निहाय आरक्षण जाहीर झाले असल्याने इच्छुकांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.तर राजकीय पक्ष सुध्दा कामाला लागले आहे.आता निवडणुका तीन महिने पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने निवडणूक लढू इच्छिणाºयांना आणि राजकीय पक्षांना सुध्दा मोर्चेबांधणीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व निवडणुका या भयमुक्त आणि शांततेच्या वातावरणात पार पडाव्यात या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने जि.प.निवडणुकीच्या कार्यक्रमाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. पुढील आदेश मिळाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.- स्मिता बेलपत्रे,निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया.
जि.प.निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 6:00 AM
गोंदिया जि.प.आणि पंचायत समितीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कालावधी येत्या २० जुलै रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी जि.प.आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या जाणार होत्या. राज्य निवडणूक आयोगाने २८ फेब्रुवारीपासून जि.प.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता.
ठळक मुद्देराज्य निवडणूक विभागाचे निर्देश : पुढील आदेशापर्यंत ‘जैसे थे’ कार्यक्रम