लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेचा सन २०१९-२०२० चा सुधारीत व २०२०-२१ चा २३ कोटी ४० लाख ६२ हजार रुपयांच्या संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प जि.प.उपाध्यक्ष अल्लाफ हमीद यांनी गुरूवारी (दि.५) सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पात जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणारा निधी ८ लाख रुपये कायम ठेवण्यात आला. तर महिला बालकल्याण, पाणी पुरवठा आणि कृषी विषयक योजनांवर तरतूद करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा गुरूवारी दुपारी १२ वाजता जि.प.च्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षा सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात झाली. जि. प. उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती अल्लाफ हमीद यांनी दुपारी १ वाजता अर्थसंकल्प सादर केला. या वेळी सन २०१९-२० चा ३३ कोटी ८८ लाख २९ हजार १४५ रुपयांचा सुधारित तर सन २०२०-२१ चा २३ कोटी ४० लाख ६२ हजार रूपयांचा संभावित अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात समाज कल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बाल कल्याण व दिव्यांग कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली.जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणारा निधी ८ लाख रूपये करण्यात आला. जिल्हा परिषदेचे वर्षातील उत्पन्न २०१९-२० च्या अर्थसंकल्पात २३ कोटी २९ लाख १५ हजार ५८४ रुपये एवढे निर्धारीत करण्यात आले होते. ते मात्र सुधारित अर्थसंकल्पात कोटी ५१ लाख २३ हजार ६४४ रुपयांवरच थांबल्याने ६ कोटी वाढीव उत्पन्नाचे लक्ष जिल्हा परिषद पुर्ण करु न शकली नाही. तर संभाव्य २०२०-२१ संभाव्य उत्पन्न १५ कोटी ५४ लाख ३२ हजार रुपये निर्धारित करण्यात आले आहे.अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर, काँग्रेसचे गटनेते पी.जी.कटरे व किशोर तरोणे, राजलक्ष्मी तुरकर, उषा मेंढे, सुरेश हर्षे, राजेश भक्तीवर्ती यांनी सहभाग घेतला.पाणी व शौचालयासाठीप्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये पिण्याचे पाणी व शौचालयासाठी नवीन लेखाशिर्ष तयार करु न १० लाखांची तसेच स्वयंसहाय्यता हायस्कुल (नविन लेखाशिर्ष) अंतर्गत १० लाख रुपयांची तरतूद ही शिक्षण विभागाला देय ५ टक्के निधीपेक्षा अधिक करण्यात आली आहे.समाजकल्याण विभागावर भरसमाजकल्याण विभागाच्या विविध योजनासांठी ५८ लाख ४१ हजार रुपयांची तरतूद २० टक्के हिस्स्यानुसार करण्यात आली आहे. अपंगाना तीनचाकी सायकल, श्रवणयंत्र, संगणक प्रशिक्षण, दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी अर्थसहाय्य याकरीता १४.५० लाख, महिला बालकल्याण विभागासाठी ३३ लाख, ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी ५८ लाख रुपयांची तरतूद व कृषी विभागासाठी ४३.४४ लाख रु पयांची तरतुद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.उत्पन्न वाढविण्याकडे दुर्लक्षगोंदिया जिल्हा परिषदेच्या सादर झालेला अर्थसंकल्प हा चुकीच्या आकड्यावर सादर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी कुठलीही तरतूद व नियोजन नसल्याची टिका जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केली. तसेच अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील कृषी, आरोग्य व शिक्षणावरील तरतूदीकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच बांधकाम विभागाला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप केला.
जि.प.चा २३ कोटी ४० लाखांचा संभाव्य अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 5:00 AM
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा गुरूवारी दुपारी १२ वाजता जि.प.च्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षा सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात झाली. जि. प. उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती अल्लाफ हमीद यांनी दुपारी १ वाजता अर्थसंकल्प सादर केला.
ठळक मुद्देसदस्यांचा निधी कायम : महिला बालकल्याणसाठी भरीव तरतूद